खानापूर: राष्ट्रपती आदर्श शिक्षक पदकप्राप्त आबासाहेब दळवी आणि निवृत्त मुख्याध्यापिका अरूंधती दळवी यांच्या लग्नाचा ४५ वा वाढदिवस महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी माजी आमदार दिगंबर पाटील, समितीचे माजी अध्यक्ष गोपाळ देसाई, मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण कापोलकर, निवृत्त शिक्षक डी.एम.भोसले, डी.एम.भोसले, प्रकाश चव्हाण, महादेव घाडी, बाळसाहेब शेलार, अनंत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी, दळवी दाम्पत्याने केक कापला. त्यानंतर माजी आमदार दिगंबर पाटील यांनी आबासाहेब दळवी आणि अरूंधती दळवी यांना सुनिता पाटील यांनी हार अर्पण करून शुभेच्छा दिल्या. त्यानंतर अनेकांनी त्यांना हार अर्पण करून तसेच गुष्पगुच्छ देऊन सदिच्छा व्यक्त केल्या. पत्रकार वासुदेव चौगुले यांनी दळवी दाम्पत्याचा परिचय करून देतांना दळवी दाम्पत्याने शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानाची माहिती दिली. मराठी भाषा आणि संस्कृती संवर्धनातही त्यांनी बहुमोल योगदान दिल्याचे ते म्हणाले.
आबासाहेब दळवी यांनी म.ए.समितीच्या कार्यात स्वत:ला झोकून दिले आहे. त्यांच्या या कार्याची दखल समितीने घ्यायला हवी. तसेच त्यांच्यासारख्या क्रियाशील व्यक्तीकडे लढ्याची जबाबदारी सोपवायला हवी, असे मत समितीनेते महादेव घाडी यांनी व्यक्त केले. माजी आमदार दिगंबर पाटील यांनीही उभयतांना शुभेच्छा देतांना आगामी काळात त्यांच्याकडून मराठी भाषा-संस्कृती आणि मराठी माणसाची सेवा घडावी, अशी सदिच्छा व्यक्त केली. यावेळी समितीचे अनेक नेते उपस्थित होते.
अभिजीत कालेकर यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कार
समांतर क्रांती न्यूज लोककलावंत अभिजीत कालेकर यांना नाशिक येथील तेजस फाउंडेशनच्यावतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कार २०२३ ने सन्मानित करण्यात आले. छ. संभाजीनगर ( औरंगाबाद) येथे झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. मराठी लोक संस्कृतीची जोपासना, त्यासाठीचं कार्य आणि कला- सांस्कृतीक कार्याची दखल घेवून त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. या प्रसंगी […]