समांतर क्रांती न्यूज
बंगालच्या उपसागरातील वारे सक्रिय झाले असून आजपासून (ता.२३) पाऊस बरसणार असल्याची आनंद वार्ता हवामान खात्याने दिली आहे. पर्जन्यवृष्टीला पूरक वातावरण तयार झाले अल्याने उद्यापासून (ता.२४) गोवा, कोकण किनारपट्टी तसेच मध्य महाराष्ट्रात जोरदार पर्जन्यवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातही समाधानकारक पाऊस होईल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. काल गुरूवारी कणकुंबी आणि चोर्ला घाट परिसरात कांही काळ धुके दाटले होते. तसेच सौम्य पर्जन्यवृष्टीचा अनुभवदेखील स्थानिकाला अनुभवता आला. शुक्रवारी सकाळपासून ढगाळ वातावरण असल्याने सायंकाळपर्यंत पावसाला सुरूवात होईल, अशी आशा व्यक्त होत आहे.
चोर्ला घाटात शिर्डीला जाणाऱ्या वाहनाचा अपघात
खानापूर: गोव्याहून शिर्डीला निघालेल्या कारला बेळगावहून गोव्याकडे जाणाऱ्या चेसीने जोराची धडक दिल्याने अपघात घडला. केवळ सुदैवाने कार दरीत कोसळली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. यामध्ये सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही, असे वाळपई पोलीसांनी सांगितले. कारचे मात्र मोठे नुकासन झाले आहे. दरम्यान, अपघातानंतर चेसी चालकाने जंगलातून पळ काढला. पण त्याला केरी चेकपोस्टवर ताब्यात घेण्यात आले. अपघात […]