खानापूर: गोव्याहून शिर्डीला निघालेल्या कारला बेळगावहून गोव्याकडे जाणाऱ्या चेसीने जोराची धडक दिल्याने अपघात घडला. केवळ सुदैवाने कार दरीत कोसळली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. यामध्ये सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही, असे वाळपई पोलीसांनी सांगितले. कारचे मात्र मोठे नुकासन झाले आहे. दरम्यान, अपघातानंतर चेसी चालकाने जंगलातून पळ काढला. पण त्याला केरी चेकपोस्टवर ताब्यात घेण्यात आले. अपघात झाल्यानंतर बॉडी बांधणीसाठी जाणारी चेसी आणि अपघातग्रस्त कार रस्त्यावर राहिल्याने बराच काळ घाटातील वाहतूक कोलमडली होती. पोलिसांनी उशिरा वाहतूक सुरळीत केली.
चोर्ला घाट पुन्हा चर्चेत; पत्नीनेच फेकला पतीचा मृतदेह
समांतर क्रांती न्यूज जांबोटी ते केरीपर्यंतच्या चोर्ला राज्य महामार्गावर खूनाच्या घटना सहज खपून जातात, असा गुन्हेगारांचा गैरसमज झाला आहे. त्यामुळे गेल्या कांही वर्षात बेळगाव, गोवा आणि महाराष्ट्रातून सुध्दा खून झालेले मृतदेह चोर्ला घाटातील दऱ्यांमध्ये फेकून देण्याचा जणू ट्रेंड सुरू झाला आहे. दीर्घ काळानंतर पुन्हा एकदा चोर्ला घाट चर्चेत आला आहे. बेळगाव येथील संध्या रमेश कांबळे […]