समांतर क्रांती न्यूज
जांबोटी ते केरीपर्यंतच्या चोर्ला राज्य महामार्गावर खूनाच्या घटना सहज खपून जातात, असा गुन्हेगारांचा गैरसमज झाला आहे. त्यामुळे गेल्या कांही वर्षात बेळगाव, गोवा आणि महाराष्ट्रातून सुध्दा खून झालेले मृतदेह चोर्ला घाटातील दऱ्यांमध्ये फेकून देण्याचा जणू ट्रेंड सुरू झाला आहे. दीर्घ काळानंतर पुन्हा एकदा चोर्ला घाट चर्चेत आला आहे. बेळगाव येथील संध्या रमेश कांबळे हिने अनैतिक संबंधातून सहकाऱ्यांच्या मदतीने पतीचा खून करून मृतदेह चोर्ला घाटात फेकून दिल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, संध्या हिचे बाळू बिरजे नामक तरूणाशी अनैतिक संबंध होते. रंगारी असणारा पती रमेश कांबळे (वय ३८, रा. आंबेडकरनगर-बेळगाव) हा त्यांच्या संबंधात अडसर ठरला होता. त्याला या अनैतिक संबंधांची कुणकुण लागल्याचे लक्षात येताच त्या दोघांसह अन्य तिघांनी झोपेच्या गोळ्या देऊन नंतर गळा आवळून रमेश याचा खून केला. त्यानंतर मृतदेह चोर्ला घाटात फेकून दिला.
खूनाचा संशय येऊ नये यासाठी त्या चौघांनी फिल्मी स्टाईल कथा रचली. त्यानुसार २८ मार्चपासून अचानक बेपत्ता असलेल्या पतीबाबत ५ जून रोजी संध्या हिने ‘मिसिंग’ तक्रार एपीएमसी पोलीस स्थानकात नोंदविली. पती दुसऱ्या महिलेसमवेत पळून गेला असल्याची शक्यता संध्या हिने वर्तविली होती. पण, पोलीसांना तिच्यावरच संशय आल्याने कसून चौकशी केल्यानंतर सदर खूनाचा छडा लागला.
याप्रकरणी संध्या कांबळे, बाळू बिरजे यांच्यासह अन्य दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. रमेश याच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे. संशयीत चारही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. पतीच्या बेपत्ता होण्याचा बनाव रचणारी पत्नी संध्या कांबळे आणि तिचा प्रियकर बाळू बिरजे यांच्यासह त्यांना साथ देणारे अन्य दोघेजण जेरबंद झाले आहेत. त्यांची कसून चौकशी केली जात असल्याने पोलिसांनी सांगितले.
अपघात झाला, ‘देवदूत’ मदतीला आला!
खानापूर: कुठेही एखादी दुर्घटना घडली की, तेथे माजी आमदार अरविंद पाटील जणू देवदूत बनून हजर होतात. स्वत:चे कितीही महत्वाचे काम असो, ते कुणालाच टाळत नाहीत. त्याची प्रचिती तालुकावासीयांना पुन्हा-पुन्हा येते. शुक्रवारी त्याची पुन्हा अनुभुती आली. नंदगड मार्केटिंग सोसायटीजवळ लग्नाला जायला उशिर झाल्याने गडबडीत चालत जाणाऱ्या जटगे येथील व्यंकाप्पा महादेव तीनेकर (वय ७५) वृध्दाचा पाय वाटेत […]