समांतर क्रांती न्यूज
खानापूर: मागिल महिन्यात वाघांच्या मुक्त संचाराने सावरगाळीत भितीचे वातावरण होते. वाघ गेल्यानंतर आता हत्तींचे आगमन झाले असून पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. दोन हत्ती गेल्या चार दिवसांपासून या परिसरात मुक्त संचार करीत असल्याचे नागरीकांनी समांतर क्रांतीशी बोलतांना सांगितले.
आनंदगडाच्या पायथ्याशी असलेल्या जंगलात नेहमीच श्वापदांचा वावर असतो. गेल्या महिन्यात दोन वाघांनी शेतकऱ्यांना दर्शन दिले होते. कांही काळ हे वाघ या परिसरातच वास्तव्याला होते. त्यामुळे पेरणीपूर्व मशागतीच्या कामात गुंतलेल्या शेतकऱ्यांची बोबडी वळली होती. कांही दिवसानंतर वाघांनी तळ हलविला. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला असतांनाच पुन्हा नवे संकट उभे राहिले आहे.
दोन हत्तींचे चार दिवसांपूर्वी या परिसरात आगमन झाले आहे. त्यांनी नुकताच कोंब फुटलेल्या पिकांतून संचार केल्यामुळे नुकसान झाले आहे. शिवाय प्रा.डॉ. इराप्पा गुरव यांच्या शेतातील केळींच्या झाडांचे मोठे नुकसान हत्तींनी केले आहे. तुरळक पावसाला सुरूवात झाल्यामुळे हत्ती याच परिसरात तळ ठोकून आहे. पावसाचा जोर वाढल्यास त्यांचा मुक्काम वाढण्याची शक्यता आहे. कारण, दलदल निर्माण झाल्यास हत्ती इतरत्र न जाता एकाच परिसरात तळ ठोकतात. वनखात्याने या हत्तींचा बंदोबस्त करावा, अशी मागणी या परिसरातील नागरीकांतून होत आहे.
गेल्या चार दिवसांपासून दोन हत्तींनी परिसरात तळ ठोकला आहे. जंगलातील बांबुंची बेटांची मोडतोड केली आहे. नुकताच पेरणी झालेल्या शेतजमिनीतून हत्ती फिरत असल्याने आधीच दुबार पेरणी करावी लागल्याने हैराण झालेला शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. केळीच्या बागांचेही नुकसान झाले असून वनखात्याने त्यांचा बंदोबस्त करावा.
- नारायण कापोलकर, सावरगाळी
देवाचीहट्टीतील गावठाण जमिन कुणाच्या घशात?
समांतर क्रांती वृत्त खानापूर: बैलूर ग्राम पंचायत अखत्यारीतील देवाचीहट्टी येथील सुमारे सहा एकर गावठाण जमिन बनावट दाखल्याद्वारे लाटल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. यासंदर्भात कांही दिवसांपूर्वी जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोईर यांना निवेदन देण्यात आले असून या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश त्यांनी बजावले आहेत. यामध्ये तत्कालीन पंचायत विकास अधिकारी आणि अध्यक्षांनी हात ओले आणि […]