समांतर क्रांती वृत्त
खानापूर: बैलूर ग्राम पंचायत अखत्यारीतील देवाचीहट्टी येथील सुमारे सहा एकर गावठाण जमिन बनावट दाखल्याद्वारे लाटल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. यासंदर्भात कांही दिवसांपूर्वी जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोईर यांना निवेदन देण्यात आले असून या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश त्यांनी बजावले आहेत. यामध्ये तत्कालीन पंचायत विकास अधिकारी आणि अध्यक्षांनी हात ओले आणि खिसे गरम करून घेतल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.
गावाजवळ सहा एकर सरकारी गावठाण होते. ते पडिक असल्याने गावकरी तेथे भातासह अन्य पिके घेत होते. पण, अचानक ही जमिन दशरथ बाबू धुरी, तुकाराम बाळू गावडे, यशोधरा नारायण गावडे, रघूनाथ सीताराम बामणे यांच्या नावे करण्यात आल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. त्यासंदर्भात सखोल चौकशी करून संबंधीतांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती.
जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्याची गंभीर दखल घेत चौकशी करून आहवाल सादर करण्याचे आदेश तालुका पंचायत कार्यकारी अधिकाऱ्यांना केली आहे. लवकरच याबाबतची चौकशी पूर्ण होऊन देवाचीहट्टीमधील जमिन नेमकी कुणाच्या घश्यात गेली आहे, हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे संबंधीतांनी ग्रामस्थांना जुन्या-नव्या वादाच्या निमित्ताने त्रास देण्याचा सपाटा चालविल्याची चर्चा आहे. त्यासाठी विनाविलंब या प्रकरणाचा छडा लावावा, अशी ग्रामस्थांनी मागणी आहे.
सदर तक्रार ग्रा. पं. सदस्य प्रदीप कवठणकर, महादेव केरीकर, जयवंत कवठणकर, रामचंद्र कवठणकर, विनोद धुरी, धुळाजी कुंभार, भोजू बामणे, संतोष कुंभार, महादेव गोवेकर, दीपक कुंभार, मालोजी कवठणकर, विष्णू कुंभार, सुहास कवठणकर, लक्ष्मण कवठणकर, समीर कवठणकर, अंजय कवठणकर, शिवाजी कवठणकर, विलास कवठणकर आदींसह अन्य ग्रामस्थांनी केली आहे. त्यालुक्यासह खानापूर शहरातील गावठाणावर अशाच प्रकरे अतिक्रमण झाल्याच्या घटना घडल्या असून त्यांचाही यानिमित्ताने पर्दाफाश करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
खानापूर तालुक्यात कुठे आहे हा ‘अंतराळी गुंडा’
समांतर क्रांती विशेष खानापूर तालुका हे आश्चर्य आणि अत्यर्क्यासह कुतुहल निर्माण करणाऱ्या गोष्टींचे माहेरघर आहे. निसर्ग आणि निर्मिकांने दोन्ही हातांनी खानापूर तालुक्यावर आविष्कार केला आहे. कांही ठिकाणे तर पर्यटकांचे औत्सुक्य वाढविणारी आहेत. पण, त्यांची ओळख करून देत त्या ठिकाणांना पर्यटनाचा दर्जा मिळवून देण्यात स्थानिक लोकप्रतिनिधींध्ये उदासिनता आहे. परिणामी, अशी अनेक पर्यटनस्थळे काळाच्या पडद्याआड आणि स्थानिकांच्याही […]