खानापूर: गुंजी कृषी पत्तीन सहकारी संघाची निवडणूक विरोध करण्यात यश आले. माजी आमदार अरविंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली जुन्या संचालकांसह अन्य कांही नव्या उमेदवारांचा समावेश करून ही निवड करण्यात आली. माजी आमदार अरविंद पाटील यांच्यासह भाजप नेते शरद केशकामत आणि किशन चौधरी यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले.
अविरोध निवड झालेल्या संचालकांमध्ये सतिश कुलकर्णी, प्रकाश गावडे, गजानन पवार, वसंत बांदोडकर, हरिहर बिर्जे, मारूती घाडी, संजय मादार, तानाजी पुजारी, संतोष पाटील, अल्लीमुर्तजा मुजावर, ज्योती तोलगेकर आणि सविता कामतगेकर यांचा समावेश आहे. संस्थेचे सेक्रेटरी मल्हारी करंबळकर यांनी नुतन संचालकांचे
स्वागत केले.
नंदगड मार्केटिंग सोसायटीकडून लूट; खत गोदामावर छापा
समांतर क्रांती न्यूज नंदगड: येथील मार्केटिंग सोसायटीच्या खत गोदामावर सहायक कृषी संचालकानी छापा मारला. खते अधिक दराने विकून शेतकऱ्यांची लूट केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आल्याने त्यांनी खत गोदाम सील केले. तसेच मार्केटिंग सोसायटीचे व्यवस्थापक अभयकुमार पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे, अशी माहिती सहायक कृषी संचालक डी.बी.चव्हाण यांनी ‘समांतर क्रांती’ला दिली. नंदगडमधील खानापूर […]