समांतर क्रांती वृत्त
जांबोटी: गावठाण जमिनीत अतिक्रमण केल्याच्या तक्रारीनंतर पाहणीसाठी आलेल्या चौकशी अधिकाऱ्यांनी नागरिकांचे म्हणणे न ऐकताच पलायन केल्याची घटना घडल्याने देवाचीहट्टी येथील नागरीकांतून संताप व्यक्य होत आहे. गावातील लोकांनी आपणाला जमिन हवी, यासाठी हुज्जत घालत गोंधळ माजविल्याने तेथे थांबण्यात अर्थ नव्हता, असे चौकशी अधिकाऱ्यांनी ‘समांतर क्रांती’शी बोलतांना सांगितले.
देवाचीहट्टी येथील गावठाण जमिन कांही मोजक्याच व्यक्तींनी आपल्या नावाने करून घेतली आहे. याबाबत जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यनिर्वाहक अधिकाऱ्यांना निवेदन देऊन संबंधीतांवर कारवाईची मागणी करण्यात आली होती. याबाबतच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या समितीच्या सदस्यांनी नुकताच सदर जमिनीची पाहणी केली. यावेळी तालुका पंचायतीचे सहायक कार्यकारी अधिकारी देवराज यांच्या नेतृत्वाखालील सदस्यांनी गावकऱ्यांच्या जबान्या नोंदविल्या. यादरम्यान संपूर्ण गावठाण किती? त्यामध्ये घरे बांधली आहेत,की शेती घेतली आहे? गावठाणमध्ये शेती घेतली असून एवढी जागा यांच्या कब्ज्यात कशी आली? यापूर्वी याठिकाणी काय होते अशी विचारणा आधिकऱ्यानी नागरिकांना केली असता. पूर्वी ही जागा सार्वजनिक वापरात होती. अलीकडे २००५ ते २०१० या काळात मोजक्याच लोकांच्या नावे जागा नोंद करण्यात आली आहे. ती बेकायदेशररित्या नावावर लावून घेतल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यावर कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. याबाबतचा अहवाल ता.पं.कार्यनिर्वाहक अधिकाऱ्यांना सादर करण्यात येणार आहे. त्याची शहानिशा करून तो जि.पं.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात येणार असल्याचे श्री.देवराज यांनी सांगितले.
दरम्यान, जमिनीची पाहणी केल्यानंतर गावात चौकशी सुरू असतांना कांही नागरीकांनी अधिकाऱ्यांना घेराव घालून प्रश्नांचा भाडीमार केला असता, अधिकाऱ्यांनी तेथून पलायन केले. आम्हालाही गावठाण समिनीत हिस्सा हवा अशी या नागरीकांची मागणी होती. अधिकाऱ्यांनी नागरीकांच्या प्रश्नांना हरताळ फासत पलायन केल्याचे तसेच अनावश्यक प्रश्न विचारणाऱ्यांना जमिनी लाटलेल्यांनी जाणिवपूर्वक तेथे पाठविल्याचा आरोप तक्रारकर्त्यांनी केला आहे. अधिकाऱ्यांनी मात्र आमच्याशी कांहीनी हुज्जत घालायला सुरूवात केल्याने आम्ही तेथून निघून आलो, असे सांगितले.
यावेळी ग्राम पंचायत सदस्य प्रदीप कवठणकर, पंचायत विकास अधिकारी संतोष चौगुले, सचिव नारायण गोंडे, माजी अध्यक्ष रमेश धुरी, मोतीराम गावडे पुंडलिक हेब्बाळकर, जयवंत कवठणकर, महादेव गोवेकर, सतीश धुरी, संतोष कुंभार, अजय कवठणकर, दीपक कुंभार, रामचंद्र कवठणकर, ग्रा.पं.कर्मचारी तुकाराम कुंभार, किरण कवठणकर, रामलिंग बुरुड, नागोजी गावडे, संजय बामणे, परशुराम गावडे , रघुनाथ बामणे आदी नागरीक उपस्थीत होते.
खानापूर बीईओंची बदली, हे असतील नवे बीईओ!
समांतर क्रांती वृत्त खानापूर: राज्यातील शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. शिक्षण सचिवांनी बदल्यांच्या यादीला मंजुरी दिली आहे. शनिवारी (ता.०१) सायंकाळपर्यंत यासंदर्भातील अंतिम आदेश दिला जाणार आहे. खानापूरच्या क्षेत्रशिक्षणाधिकारी राजेश्वरी कुडची यांचीही बदली झाली असून त्यांच्या जागी बेळगावचे क्षेत्रशिक्षणाधिकारी वाय. जे. बजंत्री यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. शुक्रवारी ही प्रक्रिया तातडीने करण्यात आली असून बेळगाव जिल्हा […]