समांतर क्रांती वृत्त
खानापूर: बरगावजवळच्या झाडीत हिरेमुनवळ्ळी येथील विवाहीतेचा मृतदेह आढळून आला असून यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. मंगला पुजारी (वय ३०) असे तीचे नाव असून तीने आत्महत्या केली की हा घातपाताचा प्रकार आहे, याबाबत पोलीस तपास सुरू झाला आहे. सहा दिवसांपासून ती बेपत्ता होती.
दुपारी खानापूर पोलिसांना बरगावजवळ मृतदेह असल्याची माहिती मिळाली. पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, मृतदेहाशेजारी आधारकार्ड आढळून आली. त्यातील एक मंजुळा पुजारी हीचे असून अन्य एक तीच्या नवऱ्याचे आहे. देवळात फोडलेला नारळदेखील मृतदेहाशेजारी आढळला आहे. तीने विष प्राशन केले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. मिळालेल्या माहितीनुसार तिचा नवरा मानसिक अस्वस्थ असून मंजुळा ही पारिश्वाड येथील एका पेट्रोल पंपवर कामाला होती, असे समजते. अधिक तपास सुरू आहे.
खानापूर म.ए.समितीची कोंडी फुटणार का?
आता मला बोलावंच लागेल / चेतन लक्केबैलकर खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नव्या कार्यकारिणी निवड करण्यासंदर्भातील समितीचे गठण केले जाण्याची शक्यता आहे. अर्थातच ती धूसर आहे. त्याची कारणेही तशीच आहेत. खानापूर तालुका म.ए.समितीच्या आतापर्यंतच्या इतिहासाला काळीमा फासणारा पराजय यावेळच्या विधानसभा निवडणुकीत झाला. तो अपेक्षितच होता. त्याबाबत चर्चा आणि विचारमंथन करण्याची कुवत समितीच्या नेत्यांमध्ये नाही, हे […]