समांतर क्रांती वृत्त
खानापूर: मलप्रभा नदीतून वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी वाढल्या असतांनाच पोलिसांनी टाकलेल्या धाडीत असोगा येथील शिवारातील अवैध वाळूसाठा जप्त करण्यात आला. पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरात अवैध वाळू व्यवसाय सुरू होता. जिल्ह्यातील वाळू उपशावर ऑक्टोबरपर्यंत बंदी घालण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बजावला असून त्याचाच भाग म्हणून आता पोलीस आणि महसूल खात्याने वाळू उपसा आणि अवैध साठ्यावर धाडी टाकण्याचे सत्र सुरू केले आहे. परिणामी, वाळू व्यावसायिकांची खळबळ उडाली आहे.
चोर्ला घाट: वर्षा पर्यटनाची पर्वणी
सदाहरीत जंगल झाडीतून गोवा राज्यात जाणारा चोर्ला महामार्गावरील निसर्ग सौंदर्य नेहमीच पर्यटकांच्या मनाला भूरळ घालत आले आहे. पावसाळ्यात पर्यटकांची मांदियाळी जमविणाऱ्या चोर्ला घाटातील विलोभनीय निसर्ग सौंदर्य पावसाळ्यानंतरही कांहीकाळ पर्यटकांना घाटात थबकायला भाग पाडते. गोव्याकडे जाणारा किंवा गोव्याहून धुंद होऊन परतणारा प्रत्येकजण घाटातील सौदर्याचा मनमुराद आनंद आणि अस्वाद घेताना दिसतो. नागमोडी वळणे, दाट जंगलझाडी त्यातून धबाबा […]