समांतर क्रांती वृत्त
खानापूर: जुलैच्या पहिल्या आठवड्यात तालुक्यात केवळ ७८.८ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. जून दहाला मान्सून तालुक्यात पोहचला तरी पावसाच्या तुरळक शिडकावा सोडला तर महिनाभरात एकदाही मुसळधार कोसळलेली नाही. जुलैच्या पहिल्या आठवड्यात तरी दमदार पाऊस होईल अशी तालुकावासीयांची आशा होती. तीदेखील धुळीला मिळाली आहे.
तालुक्यात सुमारे ३० हजार हेक्टरमध्ये भात पिक घेतले जाते. त्यातील निम्म्याहून अधिक भाताची लागवड केली जाते. जूनपूर्वी आणि जूनमध्ये भातपेरणी करण्यात आली. पण, पावसाअभावी अंकूरले नाही. परिणामी, अनेक गावांमध्ये दुबार पेरणी करावी लागली. आता कांहीअंशी भात अंकुरले असले तरी दमदार पावसाअभावी पुढील शेतीकामांना ब्रेक लागला आहे. रोप तयार झालेले नाहीत. पाऊस नसल्याने आवश्यक पाणी शिवारात नाही. त्यामुळे चिखल करून भाताची लागवड करण्यास विलंब होणार आहे.
खानापूर तालुक्यातील जुलै महिन्यातील पाऊस विक्रमी असतो. ओला दुष्काळाची चाहूल देणारा असतो. तरीही तो पिकांसाठी अश्वासक ठरतो. त्यामुळे दररोजच्या रिपरिपीने तालुकावासीय वैतागले आहेत. सकाळी उन आणि दुपारनंतर रिपरीप असा पावसाचा दिनक्रम सध्या सुरू आहे. सहा दिवसात केवळ ३.१ इंच पावसाची नोंद झाली आहे. दरवर्षी जुलैमध्ये तालुक्यात दररोज तीन इंचापेक्षा अधिक पावसाची नोंद होत असते. एकंदर, यंदाच्या मान्सूनला विक्रमी पावसाची ‘सर’ नसल्याने दिसून येत आहे.
घाटात मुसळधार
तालुक्याच्या पश्चिम घाटात मात्र मुसळधार कोसळत आहे. कणकुंबी-जांबोटी, शिरोली-गवाळी या भागात दमदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदी-नाले प्रवाहीत झाले असले तरी अद्याप दुथडी भरलेले नाहीत. जांबोटी ते चोर्ला घाटात मुसळधार पावसामुळे रस्त्यावर झाडे कोसळण्याच्या घडत असल्याने चालकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
चिगुळेच्या ३५ जणांना महिनाभरानंतर जामिन
समांतर क्रांती वृत्त खानापूर: जमिनीच्या वादातून चिगुळे येथे झालेल्या हाणामारीच्या प्रकरणात ३५ जणांना जिल्हा आणि सत्र न्यायालयाने सशर्त जामिन मंजूर केला आहे. माउली मंदिर आणि देवस्थानाची जमिन यावरून गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. दि. ५ जूनरोजी त्याचे पर्यावसान मारामारीत झाले होते. मुख्य संशयीत चौगुले याच्यासह अन्य ३४ जणांनी घरावर हल्ला करून मारहाण केल्याची फिर्याद […]