समांतर क्रांती वृत्त
बंगळूर: मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी त्यांच्या राजकीय आणि संसदीय कारकिर्दीतील १४ वा अर्थसंकल्प मांडत यापूर्वीचा माजी मुख्यमंत्री रामकृष्ण हेगडे यांच्या नावावर असलेला विक्रम मोडीत काढला. त्याच बरोबर त्यांनी अर्थसंकल्पात पहिल्यांदाच शिक्षण खात्यासाठी तब्बल ३७ हजार कोटींच्या निधीची तरतूद करीत वेगळेपण जपले. भौतिक विकासाबरोबरच राज्याच्या बौधिक विकासाकडेही तेवढ्याच गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
त्यामधून शाळा खोल्यांसाठी ३१० कोटी, पदवीपूर्व कॉलेज खोल्यांसाठी २४० कोटी अशा प्रकारे ५५० कोटींच्या निधीतून ८ हजार ३११ खोल्या बांधल्या जाणार आहेत. ५ हजार ७७५ शाळा आणि १५० कॉलेजमध्ये शौचालय उभारणीसाठी २०० कोटी, पावसामुळे पडझड झालेल्या आणि मोडकळीस आलेल्या शाळा खोल्यांसाठी १०० कोटी, शाळा आणि कॉलेजना दिल्या जाणाऱ्या अतिरिक्त निधीत वाढ करण्यात आली असून त्यासाठी एकुण १५३ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना अंडी, शेंगा चक्की आणि केळी आठवड्यातून दोन दिवस वितरीत केली जाणार असून त्यासाठी २८० कोटींचा निधी आरक्षित करण्यात आला आहे.
प्रत्येक खात्यासाठी अर्थसंकल्पात खालीलप्रमाणे तरतूद करण्यात आली आहे.
शिक्षण खाते- ३७ हजार कोटी
महिला आणि बाल कल्याण खाते- २४ हजार कोटी
इंधन खाते- २२ हजार कोटी
जलसंधारण खाते- १९ हजार कोटी
ग्राम विकास आणि पंचायत राज- १८ हजार कोटी
परिवहन आणि दळणवळण- १६ हजार कोटी
महसूल खाते- १६ हजार कोटी
आरोग्य आणि कुटुंब कल्याण खाते- १४ हजार कोटी
समाज कल्याण खाते- ११ हजार कोटी
लोकोपयोगी खाते- १० हजार कोटी
कृषी आणि बागायत खाते- ५ हजार ८०० हजार कोटी
पशू संगोपन आणि मासेमारी- ३ हजार २४ कोटी
नेरसे-कणकुंबीतील प्रकल्पांसाठी १ हजार कोटी
समांतर क्रांती वृत्तबंगळूर: म्हादईवरील कळसा-भांडुरा प्रकल्पासाठी काँग्रेस सरकारने अर्थसंकल्पात एक हजार कोटींची तरतूद केली आहे. मागीलवेळी भाजपने ५०० कोटींची तरतूद केली होती. एकंदर, प्रत्येक सरकार म्हादई प्रकल्पासाठी निधीचा पाऊस पाडण्याच्या तयारीत आहे. गोव्यातील सरकारने मात्र आतापर्यंत एक थेंबही पाणी वळवू देणार नसल्याच्या केवळ घोषणाच चालविल्या आहेत.