कारवार: ‘मन की बात’ सांगून मोदींनी देशातील जनतेला फसविले आहे. काँग्रेसने जन की बात ऐकून पाच गॅरंटी दिल्या, ज्यामुळे सर्वसामान्य माणूस स्वाभीमानाने जगत आहे. मोदींच्या ५६ इंचाच्या छातीत जनतेबद्दल कळकळ असणारे दोन इंचाचे हृदय नाही, असा घणाघात मल्लापूर (कारवार) येथील सभेत काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांनी भाजपवर केला. यावेळी त्यांच्यासमवेत मंत्री रामनाथ रै, प्रशासन आयोगाचे अध्यक्ष आर.व्ही.देशपांडे, आमदार सतिश सैल उपस्थित होते.
पुढे बोलतांना त्या म्हणाल्या, ही निवडणूक केवळ सत्तेसाठी नाही. सर्वसामान्यांचा आवाज संसदेत पोहचविण्यासाठी आहे. विविध माध्यमातून आदानी-अंबानींना श्रीमंत करणारे भाजपचे हे सरकार आहे. मोदी कितीही ढोल पिटत असले तरी त्यांच्या ५६ इंचाच्या चातीत दोन इंचाचे हृदय नाही. त्यामुळेच त्यांनी वननिवासींचे हजारो अर्जांना कचऱ्याची टोपली दाखविली आहे. मी खासदार झाल्यानंतर पहिल्याच अधिवेशनात वननिवासींच्या समस्यांबद्दल संसदेत आवाज उठविणार आहे.
हिंदुत्वाचा मुद्दा आणि रामाचा फोटो दाखविल्यास लोक मत देतील, असा भाजपचा कयास आहे. मोदी जय श्रीराम म्हणतात. व्हाट्सॲप युनिव्हर्सिटीतले तरूणसुध्दा जय श्रीराम म्हणतात. कधी हे लोक जय सीयाराम म्हणतात का? मोदींनी संसार केला असता तर त्यांना याचा अर्थ समजला असता, पण त्यांनी इतिहास सोडून नवे हिंदुत्व प्रसविले आहे, असा आरोप त्यांनी यावेळी बोलतांना केला.
प्रसंगी राज्य प्रशासन आयोगाचे अध्यक्ष आर.व्ही.देशपांडे यांनीही मोदींची चांगलीच फिरकी घेतली. ते म्हणाले, वननिवासींच्या समस्यांचे निराकरण केंद्र सरकारकडून व्हायला हवे. मोदी आले आणि गेले. त्यांनी स्थानिक समस्यांबद्दल अवाक्षरही काढले नाही. ते केवळ निवडणूक प्रचारापुरते शिल्लक राहीले आहे. सत्ता येते आणि जाते, पण जनतेच्या समस्यांची जाणिव नेत्यांना असली पाहीजे. डॉ. अंजली निंबाळकर यांना सर्वसामान्यांच्या समस्यांची, त्यांच्या जगण्याशी चाललेल्या संघर्षाची जाणिव आहे, त्यासाठी त्यांना विजयी करून या भागाचा विकास करून घ्या.
गरिबांचा जमिनी मिळवून देणारा पक्ष काँग्रेस. केंद्रात काँग्रेस सत्तेत आल्यानंतर वननिवासींच्या समस्या मार्गी लागतील, त्यासाठी डॉ. अंजली निंबाळकरांना मत द्या, असे आवाहन माजी मंत्री रामनाथ रै यांनी केले. यावेळी बोलतांना जिल्हा प्रचार समिती अध्यक्ष रविंद्र नायक म्हणाले, वनजमिनींचे हक्क मिळविण्यात अनेक समस्या आहेत. मात्र, त्यासाठी कायदे काँग्रेसच्या काळात झाले आहेत. या कायद्याची अमलबजावणी होण्यासाठी केंद्रात काँग्रेसचे सरकार आले पाहिजे.
यावेळी आमदार सतिश सैल यांनीही मत मांडून भाजपवर निशाणा साधला. सभेला जिल्हा प्रवक्ते शंभू शेट्टी, ब्लॉक अध्यक्ष समीर नायक, महिला घटक अध्यक्षा सीमा पाटील, कद्रा ग्रा.पं.अध्यक्षा हनमव्वा, उपाध्यक्षा अश्विनी पेडणेकर, सदस्या रिना डिसोझा, यल्लम्मा भोवी, बंटवाळ ब्लॉक अध्यक्ष बेबी कुंदर, केडीपी सदस्या तनुजा रंगस्वामी, मल्लापूर ग्रा.पं.अध्यक्ष उदय बांदेकर, उपाध्यक्ष पियादाद डिसोझा, इजाझ शेख आदी उपस्थित होते.
हद्द झाली…लग्न.. तेही मंगळसुत्राविना?
समांतर क्रांती विशेष पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळसुत्राच्या विषयावरून विरोधकांवर बेताल आरोप करीत आहेत. प्रत्यक्षात त्यांच्या विकासाच्या वेंधळ्या कल्पनेमुळे गोरगरिबांना मंगळसुत्राविना लग्ने करण्याची वेळ आली आहे. सोन्याचे दर तब्बल ७५०१५ रुपयांवर पोहचले असून गेल्या दहा वर्षांत तब्बल ४५ हजारांने सोने महाग झाले आहे. मोदीजी आम्ही मुलींची लग्नं कशी करु, असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे. सर्वसामान्य […]