समांतर क्रांती वृत्त
माझी माती, माझा देश या संकल्पनेंतर्गत खानापूर तालुक्याच्या प्रत्येक गावातून मूठभर माती दिल्लीत पहचणार आहे. त्याची जबाबदारी प्रत्येक पंचायतीला देण्यात आली आहे. स्वातंत्र्यसैनिक, भारतीय सैनिक आणि केंद्रीय संरक्षण दलाचे पोलीस जे आपल्या प्राणाची बाजी लावून लढले देशाचे स्वातंत्र्य आणि देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी लढणाऱ्यांना आदरांजली वाहण्यासाठीच्या राष्ट्रीय अभियानाचा हा भाग आहे.
प्रत्येक गावातील मुठभर ग्रामपंचायतच्या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे. सर्व ग्रामपंचायती ही माती १५ ऑगस्ट रोजी तालुका पंचायतीकडे जमा करणार आहेत. १६ ते २० ऑगस्टपर्यंत तालुका पंचायतीत विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. त्यानंतर संकलित केलेली माती बेळगाव जिल्हा पंचायतीला आणि तेथून राज्य व त्यानंतर राजधानी दिल्लीला पाठवण्यात येणार आहे. या उपक्रमातून शेती आणि मातीशी नातं घट्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
स्वातंत्र्यसैनिक, भारतीय सैनिक आणि केंद्रीय संरक्षण दलाचे पोलीस ज्यांनी आपल्या प्राणाची बाजी लावून लढले देशाचे स्वातंत्र्य आणि देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी बलीदान दिले, त्यांची आठवण म्हणून सर्वत्र शिलाफलक उभारले जाणार आहेत. त्यासाठी माझी माती, माझा देश हे अभियान राबविले जात आहे. यावेळी हरघर तिरंगासह शिवारातदेखील तिरंगा फडकवला जाणार आहे. त्याशिवाय प्रत्येक पंचायतीवर शहिद जवान, स्वातंत्र्यसैनिक आणि देशासाठी बलिदान दिलेल्या विरांच्या नावांचा शिलाफलक लावण्यात येणार आहे. दिल्लीतही असा शिलाफलक लावला जाणार असून त्यासाठी देशभरातील खेड्यांतून मुठभर माती जमा केली जात आहे.
खानापुरातील गावेही जाणार बेळगावमध्ये? कसे असतील नवे जिल्हे?
समांतर क्रांती विशेष / चेतन लक्केबैलकर बेळगाव जिल्ह्यासह बेळगाव तालुक्याच्या विभजनाची घोषणा पालकमंत्री सतिश जारकीहोळ्ळी यांनी स्वातंत्र्यदिनी केली. गेल्या तीन दशकांपासून सुरू असलेल्या या वादाला पुन्हा तोंड फुटले आहे. विशेष म्हणजे जिल्हा विभजनाच्या वादात आता बेळगाव तालुक्याचे विबाजन हा नवा मुद्दा समोर आल्यामुळे चर्चेचा उधाण आले आहे. बेळगाव जिल्ह्याचे विभाजन झाल्यास खानापूर तालुक्यातील कांही गावांचाही […]