समांतर क्रांती वृत्त
A landslide occurred near Dudhsagar, railway traffic stopped कॅसलरॉक: दूधसागरला जाणाऱ्या रस्त्यावर कॅसलरॉक पासूनच्या तिसऱ्या बोगद्याजवळ दरड कोसळली आहे. रेल्वे वाहतूक सायंकाळपासून बंद आहे. त्यामुळे कांही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर कांही दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आल्या आहेत, अशी माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे.
दुपारी कॅसलरॉकपासून तिसऱ्या बोगद्याजवळ रेल्वे रूळावर दरड कोसळली आहे. डोंगराचा भाग पूर्णपणे लोहमार्गावर आल्याने माती आणि दगड हटविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. खात्याकडून दरड बाजूला सारण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र, त्याला उशिर लागणार असल्याने कांही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर कांही अन्य मार्गाने वळविण्यात आल्या आहेत.
वेळापत्रक असे असेल..
- यशवंतपूर एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.
- यशवंतपूर-वास्को ही ट्रेन हुबळीपर्यंत धावेल.
- निजामुद्दीन- वास्को ही ट्रेन बेळगावपर्यंत असेल.
- वास्को- निजामुद्दीन ही ट्रेन वळविण्यात आली आहे.
देशासाठी खानापूरच्या ‘या’ सुपुत्राने २२ गोळ्या अंगावर झेलल्या होत्या!
समांतर क्रांती / कारगिल विजय दिवस विशेष खानापूर: हा तालुका मुळातच शौर्याची गाथा सांगणारा आहे. येथील अनेकांनी विविध क्षेत्रात चमकदार कामगिरी करून तालुक्याचे नाव देशाच्या नकाशावर कोरले आहे. अलिकडे स्वातंत्र्योत्तर काळातही येथील अनेकांनी सैन्यदलात सेवा बजावतांना देशासाठी बलिदान दिले आहे. आज कारगिल विजय दिन. यानिमित्ताने अशाच एका धिरोदात्त वीर सैनिकाची शौर्यगाथा मांडत आहोत.. ..आणि त्यांनी […]