समांतर क्रांती विशेष / चेतन लक्केबैलकर
a-symbol-of-hindu-muslim-unity भारत हा देश जाती आणि धर्मात विभागला जात असतानाच्या काळातही धार्मिक सलोखा जोपासण्याची परंपरा गाव-खेड्यात आहे. खानापूर तालुकादेखील त्याला अपवाद नाही. मोहरमनिमित्त निघणाऱ्या पंजे, डोले, ताजिये आणि सवाऱ्यांच्या मिरवणुकीत मुस्लिमांबरोबरच हिंदू बांधवही सहभागी होतात. हे सगळीकडेच पहायला मिळते. पण, खानापूर तालुक्यातील भुरूणकी गावात हा ताबूत चक्क गाव पाटलांच्या ओसरीवर आसरा घेतो हे ऐकून आश्चर्य वाटेल. ही परंपरा केव्हा सुरू झाली हे कुणाला माहिती नाही. परंतू, गावातील सर्वधर्मीय या मिरवणुकीत सहभागी होतात आणि धार्मिक सलोखा जोपासण्यासाठी ही वीण दरवर्षी आणखी घट्ट होत जाते.
कसा होतो मोहरम?
मोहरम हा कांही सण नाही तो शहिद दिवस आहे. पण, या दिवसाने देशभरातील धार्मिक सलोखा आणि हिंदू-मुस्लिम बांधव्य जपल्याचे दिसून येते. खानापूर तालुक्यातील भुरूणकी गावात गेल्या कित्येक पिढ्या हा सलोखा जपत आहेत. मोहरमच्या ताजिया (डोल्या) मिरवणुकीत हिंदूही सहभागी होतात. इतकेच नाही तर ही डोली वर्षभर हिंदूचे मंदिर असलेल्या मरेव्वा मंदिरात विराजमान होते. मोहरमच्या आदल्या दिवशी रवळू पाटील यांच्या घरासमोर खड्डा खणून त्यात मीठ आणि लाकडे टाकली जातात. त्यानंतर तेथे बकरी आणि कोंबड्यांचा बळी दिला जातो. त्याच ठिकाणी गावजेवण केले जाते.गावातील प्रत्येक घरातून तेथे नैवेध जातो. तो अन्नदान म्हणून दलीतांना वाटला जातो.
दुसऱ्या दिवशी गावातून ढोल ताशांच्या गजरात ताबूतची (ताजिया) मिरवणूक निघते. पूर्वी तेथे ताशाच्या गजरात लेझिम खेळत हिंदू-मुस्लिम मिरवणुकीत सहभागी होत होते. आता लेझिम खेळली जात नसली तरी ढोल-ताशे असतात, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते दत्ताराम पाटील यांनी ‘समांतर क्रांती’ला दिली. मिरवणूक सुरू झाल्यानंतर ताबूत मरेव्वा मंदिरातून निघतो. तेथून चव्हाटा, गोणेदेव, विठ्ठल मंदिर असे करीत सीमेवर जातो. त्यानंतर गावप्रमुख असलेल्या पाटलांच्या घरी घरांना भेटी देवून ताबूत सायंकाळपर्यंत रवळू कल्लाप्पा पाटील यांच्या ओसरीवर विरजमान होतो.
दुपारी काही काळ गावात मिरवणूक काढून प्रत्येकाच्या दारात ताबूत जातो. त्यावेळी प्रत्येक धर्माचे लोक लाडू-पेढे ताबूतावर उधळतात. पुन्हा हा ताबूत तेथून पूर्ण भरलेल्या तलावातून मास्केनहट्टीला जातो. हे गाव भुरूणकी गावाला जोडलेले आहे. काळी नदीला जोडणाऱ्या घोमारी नाल्यापर्यंत त्याची मिरवणूक निघते. त्यानंतर रात्री उशिरा पुन्हा ताबूत वर्षभरासाठी मरेव्वा मंदिरात स्थान्नापन्न होतो.
मुस्लिमातही हिंदू नाव..
मोहरमच्या माध्यमातून भुरूनकीवासीयांनी धार्मिक सलोखा राखला आहेच. अनेक मुस्लिम बांधवांची नावेदेखील हिंदू वाटतील अशी आहेत. राजप्पा हे त्यापैकीच एक. राजप्पा बावन्नावर हे नाव मुळातच लिंगायत धर्मीय वाटत असले तरी ते मुस्लिम आहेत. राजप्पा आणि त्यांचे बमधू कासिम बावन्नावर तसेच हिंदू धर्मीय रवळू कल्लाप्पा पाटील यांच्यासह गावातील सर्वधर्मीय मोहरमचा विधी अत्यांनंदाने पूर्णत्वास नेतात.
..म्हणून गावात सलोखा आहे.
आजची स्थिती खूपच अवघड आहे. सगळीकडेच जाती-धर्मावरून वादंग निर्माण झाले आहेत. पण, आमच्या गावात मोहरमने गावातील एकता आणि धार्मिक सलोखा राखला आहे. धार्मिक वादातून दंगली झाल्याचा गावाचा इतिहास नाही. कधीच असे प्रसंग उद्भवले नाहीत. मुस्लीम धर्मीयदेखील माझे चांगले मित्र आहेत, असे दत्ताराम पाटील यांनी सांगितले.
कासिम बावन्नावर म्हणाले, गावात आम्ही अल्पसंख्य असल्याची जाणिव आम्हाला कधीच झाली नाही. आम्ही हिंदूच्या सणात सहभागी होतो. तसेच हिंदू बांधव आमच्या सणात सहभागी होतात. मोहरम तर हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक आहे.
अष्टपैलू व्यक्तीमत्व आबासाहेब दळवी
एखादा माणूस किती प्रतिभावंत असावा? विविध क्षेत्रात मुसाफिरी करणारी माणसं क्वचितच आढळतात. अशा माणसांच्या अंगी हे जे अष्टपैलू गुण असतात, ते वारसा हक्काने तर येतातच. शिवाय त्यांच्या कार्यकर्तृत्वातून त्यांच्या वर्तमानाला प्रकाशमय करून सोडतात. विशेष म्हणजे अशी माणसं समाजासाठी आदर्शवत दीपस्तंभ बनतात. असेच एक अष्टपैलू व्यक्तीमत्व म्हणजे आबासाहेब नारायणराव दळवी. तेजस्वी यशाची गरूडभरारी घेतांना त्यांना त्यांच्या […]