समांतर क्रांती न्यूज
लोककलावंत अभिजीत कालेकर यांना नाशिक येथील तेजस फाउंडेशनच्यावतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कार २०२३ ने सन्मानित करण्यात आले. छ. संभाजीनगर ( औरंगाबाद) येथे झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. मराठी लोक संस्कृतीची जोपासना, त्यासाठीचं कार्य आणि कला- सांस्कृतीक कार्याची दखल घेवून त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. बापू देसाई, नाना चव्हाण, सामाजिक कार्यकर्त्या रंजीता तोर, तेजस फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.मेघा डोळस, महेंद्र तुपे, निवेदक पंकज शिंदे, प्रा.अजिंक्य लिंगायत आदी उपस्थीत होते. अभिजीत कालेकर हे खानापूर तालुक्यातील हरहुन्नरी कलावंत असून त्यांना यापूर्वीही अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
विद्यार्थी दत्तक योजनेला मदत करून 'यांनी' केला वाढदिवस साजरा
समांतर क्रांती न्यूज मराठी विद्यानिकेतन बेळगाव विद्यार्थी दत्तक योजनेला खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून ५००० रुपयांची देणगी दिली. मराठी विद्यानिकेतन बेळगाव विद्यार्थी दत्तक योजनेच्या निधीतून गोरगरीब विद्यार्थी किंवा पालकत्व हरपलेल्या गरजू विद्यार्थ्यांना वार्षिक शैक्षणिक फी भरण्यासाठी मदत केली जाते. सदर योजनेसाठी खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी आज […]