बेळगाव: मुलीचे लग्न आवघ्या सहा दिवसांवर असतांना वडिलांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाल्याने गर्लगुंजी गावावर शोककळा पसरली आहे. अरूण मष्णू पाटील (वय ४५, रा.गर्लगुंजी) असे त्यांचे नाव असून गुरूवारी लग्नपत्रिका वाटून घरी परततांना त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने ठोकरल्याची घटना सुळगा येथे घडली.
घरात लगिनघाई सुरू होती. लग्न अवघ्या सहा दिवसांवर येऊन ठेपल्याने अरूण हे नातेवाईकांना पत्रिका वाटण्यासाठी गुरूवारी घराबाहेर पडले. सायंकाळी ते घरी परतत असतांना सुळगा गावाजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला ठोकरले. त्यात त्यांच्या डोकीला जबर मार बसल्याने ते जागीच गतप्राण झाले. या घटनेमुळे पाटील कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मयत अरूण यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात घटनेची नोंद सुरू आहे.
धूम स्टाईल घाई..जीव घेई..!
देसूर-नंदीहळ्ळी मार्गाला जोडणाऱ्या येळ्ळूर मार्गावरील वर्दळ वाढली आहे. तरूण-तरूणी राजहंसगडावर पर्यटनासाठी जात असतात. त्यांची धूम स्टाईल अपघातास कारणीभूत ठरत आहे. त्याशिवाय सायंकाळनंतर मद्यधुंद तरूणांची टोळकीही या रस्त्यावर बेफाम वाहने चालवित असून शेतवडीत जाणाऱ्या शेतकऱ्यांत भिती पसरली आहे. पोलीसांनी वेळीच अशा धूमस्टाईल वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उचलावा अशी मागणी सुळगा-येळ्ळूरमधून होत आहे.
कधी थडकणार मान्सून? काय सांगतो १०० वर्षांचा इतिहास?
समांतर क्रांती विशेष कर्नाटकातील निवडणुकीच्या धामधुमीनंतर आता शेतकऱ्याचे लक्ष शिवाराकडे वळले आहे. मान्सून कधी थडकणार याची याबाबत केवळ शेतकऱ्यांनाच नाही तर हवामान तज्ञांनानाही कुतूहल आहे. सहस: मान्सूनचे केरळमध्ये १ जून रोजी आगमन होते? पण गेल्या १०० वर्षात १९१८ साली ११ मे रोजी मान्सूनचे आगमन झाले होते. तर सर्वात उशिरा १८ जून १९७२ साली मान्सून केरळात […]