
समांतर क्रांती / खानापूर
खानापूर तालुक्याच्या बहुतेक सर्वच रस्त्यांवर गतीरोधक आहेत. पण, हे गतीरोधक अवैधानिक असल्याने ते जिवघेणे बनले आहेत. अशाच एका गतीरोधकाचा अंदाज न आल्याने दुचाकीवरून पडून जखमी झालेल्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सावित्री प्रभाकर पाटील (कडबगट्टी, ता. आळणावर) असे या महिलेचे नाव असून १९ जानेवारी रोजी नातेवाईकाच्या अत्यंविधी आटोपून पतीसमवेत गावी परतत असतांना झुंजवाड येथे अपघाताची घटना घडली होती.

मयत सावित्री या त्यांच्या नातेवाईकाचा अंत्यविधीसाठी आटोपून परतत होत्या. झुंजवाड येथे गतीरोधकाचा अंदाज आला नाही. तसेच रस्त्यावरील खड्डे चुकवितांना सावित्री या दुचाकीवरून उडून रस्त्यावर आपटल्या. त्यात त्यांच्या डोकीला जबर मार बसला. त्यांच्यावर तात्काळ नंदगड येथे उपचार करण्यात आले. नंतर अधिक उपचारासाठी बेळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना हुबळीतील किम्स् रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, उपचारांचा उपयोग न झाल्याने त्यांचे आज मंगळवारी (ता.२८) निधन झाले. त्यांच्या पश्चात सासू, पती, चिरंजीव, कन्या, सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
खानापूर तालुक्यातील बहुतेक रस्त्यांवर तांत्रिकदृष्ट्या चुकीचे गतीरोधक आहेत. त्या ठिकाणी कुठलाही सूचना फलक लावलेला नाही किंवा त्या गतिरोधकावरती पांढऱ्या रंगाचे पट्टेही मारलेले नाहीत. परिणामी, नेहमीच अपघात ठरलेले आहेत. आता नंदगड-बिडी मार्गावरील गतीरोधकांनी एका महिलेचा जीव घेतल्यानंतर तरी प्रशासनाला जाग येणार का? याप्रकरणात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कारभाराची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
खानापुरात रविवारी हिंदू जागृतीसाठी धर्मसभा: पंडीत ओगले
खानापूर: हिंदू धर्मियात जागृती निर्माण करण्यासाठी रविवारी (ता.०२) रोजी येथील मलप्रभा मैदानावर हिंदू धर्मसभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भारतीय सेवा मंचचे प्रमुख पंडीत ओगले यांनी आज मंगळवारी (ता. २८) पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, धर्मांतर, धर्म परिवर्तन, बांगलादेशात हिंदू धर्मीयावर होत असलेले अत्याचार, वफ्फ बोर्डाचा अतिरेक आणि हिंदू बांधवांमध्ये जनजागृती करण्यासाठी सदर धर्मसभेचे आयोजन करण्यात […]