रामनगर / समांतर क्रांती
बेळगाव – गोवा राष्ट्रीय महामार्गांवर जोयडा तालुक्यातील अनमोड येथे मिनी टेम्पो आणि ट्रक यांच्यात धडक बसून आज संध्याकाळी भीषण अपघात घडला. या अपघातात टेम्पो चालक जागीच ठार झाला असून ट्रक चालक गंभीर जखमी झाला आहे.
मिनी टेम्पो हा हुबळी येथून प्लायवूड भरून गोव्यात जात होता, तर ट्रक हा गोव्यातून कर्नाटकात येत असताना अनमोड येथे दोन्ही वाहनात धडक बसली. त्यात टेम्पो चालक जागीच ठार झाला असून ट्रक चालक गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
अपघात घडल्याने महामार्गवर वाहतूक कोंडी झाली असून दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. या घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलीसानी घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला.
येळ्ळूरमध्ये उद्या रविवारी साहित्याचा जागर
समांतर क्रांती / येळ्ळूर येथे उद्या रविवारी (ता. 5) रोजी 20 वे येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलन परमेश्वर नगर येळ्ळूर या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. संमेलनाध्यक्षपदी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विश्व विद्यालयातील साहित्यिक व लेखक डॉ. शरद बाविस्कर हे असणार आहेत. या संमेलनाला सिने अभिनेत्री वंदना गुप्ते ही उपस्थित राहणार आहेत. संमेलन पाच […]