जांबोटी: चोर्ला महामार्गावर बसला टेंपोने धडक दिल्याने झालेल्या अपघातात टेंपो चालक किरकोळ जखमी झाल्याची घटना आज शुक्रवारी (ता. १०) घडली. यामुळे या मार्गावर तब्बल चार तास वाहयूक कोंडी झाली होती. अपघातस्थळापासून दोन्ही बाजुला लांबच्या लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसात या घटनेची नोंद झाली आहे. कदंबा बस पणजीहून बेळगावकडे तर टेंपो बेळगावहून पणजीकडे निघाला होता. वळणावर अंदाज न आल्याने टेंपोने बसला धडक दिल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. जखमी टेंपो चालकावर उपचार सुरू आहेत.
खानापुरातील विमा एजंटला ऑनलाईन गंडा
४ लाख ४५ हजार लंपास; धागेदोरे कलकत्यापर्यंत खानापूर: येथील विमा एजंट शंकर नारायण माळवे (गणेशनगर-खानापूर) यांच्या बँक खात्यातून तब्बल ४ लाख ४५ हजारांची रक्कम लांबविण्यात आली आहे. ऑनलाईन बँकींगद्वारे ही रक्कम लुबाडण्यात आली असून कलकत्यातील एका बँक खात्यात जमा झाली असल्याचे स्पष् झाले आहे. यासंबंधी सीईएन विभागात तक्रार नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे. […]