खानापूर: दुचाकीने कारला ठोकरल्याने झालेल्या अपघातात हेब्बाळ येथील शशिकांत यल्लाप्पा मादार (वय ४५) हा दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. घटनेची माहिती मिळताच आमदार विठ्ठल हलगेकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन मयताच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. मयत शशिकांत हे टिप्पर चालक होते, ते कामावर जात असतांना ही दुर्घटना घडली.
गोवा क्रॉसजवळच्या सेवा रस्त्याने चुकीच्या दिशेने बेळगाव-पणजी महामार्गावर आले असता लोंढ्याकडे निघालेल्या कारला शशिकांत यांच्या दुचाकीची धडक बसली. यात ते गंभीर जखमी झाले. कारमधील प्रवाशांनी रुग्णवाहिकेला पाचारण केले. मात्र, रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. कारमधील बलून एअरबॅग खुल्या झाल्यामुळे सुदैवाने कारमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीसांआधी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तसेच मयताच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. या घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.
One thought on “अपघातात दुचाकीस्वार ठार, आमदार हलगेकर धावले घटनास्थळी”