करंबळजवळ ट्रकचा, तर मलप्रभा ग्राऊंडजवळ दुचाकीचा अपघात
समांतर क्रांती / खानापूर
नंदगड रस्त्यावर करंबळजवळ ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना मंगळवारी (ता. २४) सहा वाजण्याच्या सुमारास घडली. यात चालक किरकोळ जखमी झाला आहे. तर ट्रकचा समोरील भाग चाक्काचूर झाला आहे.
सदर ट्रक नंदगडहून खानापूरकडे येत होता. दरम्यान करंबळ-कौंदलदरम्यानच्या वळणावर चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने लाकूड वाहतूक करणारा ट्रक झाडाला आदळला. त्यात चालक केवळ सुदैवाने बचावला आहे. घटनेची नोंद खानापूर पोलिसात झाली आहे.
खानापुरात दुचाकीचा अपघात
येथील मलप्रभा ग्राऊंडजवळ दुचाकीस्वाराने डुक्कराला धडक दिल्याने दुचाकी कलंडून निलजी येथील तरूण जखमी झाल्याची घटना दुपारी १.२० वाजता घडली. सदर तरूण त्याच्या दुचाकीवरून शिवाजीनगरकडून शहरात येत असतांना मलप्रभा ग्राऊंडजवळ अचानक डुक्कर आडवा आला. दुचाकीस्वाराने दुचाकी आवरण्याचा प्रयत्न केला. पण, तोपर्यंत दुचाकीसह रस्त्यावर आपटल्याने तो जखमी झाला. त्याच्या डोकीला गंभीर जखम झाली असून त्याला येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सावरगाळीत ऊसाचा फडशा; शेतकऱ्यांवर संकट
समांतर क्रांती / खानापूर काल सोमवारी माणिकवाडीकडे गेलेल्या हत्तींच्या कळपाने पुन्हा रात्री सावरगाळीच्या शिवारात हैदोस घालून शेकडो टन ऊसाचा फडशा पाडला. सावरगाळी येथील ज्ञानेश्वर जायाप्पा पाटील यांना लाखोंचा फटका बसला आहे. रविवारी त्यांच्याच शेतातील पाण्याचा पंप, जलकुंभ आणि पिकांचे नुकसान हत्तींच्या कळपाने केले होते. गेल्या महिनाभरापासून गुंजी वनविभागात नऊ हत्तींनी ठाण मांडले आहे. या कळपाने […]