समांतर क्रांती वृत्त
खानापूर: गणेबैलजवळ दुचाकी दुभाजकाला आदळल्याने झालेल्या अपघातात बिडी येथील तरूण योगेश गुंडू पालेकर जखमी झाल्याची घटना घडली. तो दुचाकीवरून हत्तरगुंजीहून गणेबैलकडे जात होता. हत्तरगुंजी ते गणेबैलदरम्यान सेवारस्ता नाही. त्यामुळे वाहनचालकांना चुकीच्या दिशेने ये-जा करावी लागते. योगेश चुकीच्या दिशेने जात असतांना समोरून आलेल्या वाहनाला चुकविण्याच्या नादात त्याच्या दुचाकीने दुभाजकाला धडक दिली. त्यात तो जखमी झाला. त्याच्यावर येथील सरकारी इस्पितळात उपचार करण्यात आले. उशिरापर्यंत या घटनेची पोलिसात नोंद झाली नव्हती.
शिकार करायला गेले आणि जाळ्यात अडकले!
समांतर क्रांती वृत्त खानापूर: शिकार करायला गेले आणि स्वत:हून जाळ्यात अडकले,अशी घटना बुधवारी रात्री बरगावजवळ घडली. गर्लगुंजीला जाणाऱ्या रस्त्याला लागून असलेल्या साई मंदिरात चोरी करण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसलाच शिवाय ते आयतेच पोलिसांच्या तावडीत सापडले. त्याचे असे झाले; रात्री उशिरा तिघांनी साई मंदिराचे शटर तोडून दान पेटी फोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी मंदिराशेजारी उद्योजक के.पी.पाटील त्यांच्या वाहनात […]