खानापूर: भरधाव कारने दुचाकीला जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर कारमधील प्रवासी जखमीला उपचारासाठी बेळगावला नेले जात असतांना वाटेतच त्याचा मृत्यू झाल्याची घटना खानापूर-बेळगाव महामार्गावर घडली. रमेश अशोक पाटील हा (रा. रायबाग) हा दुचाकीस्वार व कारमधील सामीन पिरजादे (रा.बेळगाव) हे दोघे ठार झाले.
कार खानापूरहून बेळगावच्या दिशेने जात होती. दुचाकीस्वार रमेश हा एका पोल्ट्री फार्मसाठी तेक्नीशीयन म्हणून काम करीत होता. तो दुचाकीवरून बेळगावला निघाला असतांना वासकरवाडी क्रॉसजवळ कारने त्याच्या दुचाकीला जोराची धडक दिली. कारसह दुचाकी सुमारे २०० मीटर फरफटत गेली. यात रमेश याच्या डोकीला गंभीर दुखापत होऊन अतिरक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर कार रस्त्यापासून जवळच्या झाडीत जाऊन कोसळली. त्यामुळे कारमधील पाचजण गंभीर जखमी झाले. त्यातील सामीन याला बेळगावला घेऊन जातांना त्याचा वाटेतच मृत्यू झाला. अपघात इतका भयंकर होता की, कारचा अक्षरश: चक्काचूरा झाला होता. घटनेची माहिती मिळताच खानापूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेतले. अधिक तपास सुरू आहे.
One thought on “भयावह अपघात; दोन ठार, कार चक्काचूर”