
समांतर क्रांती / रामनगर
रामनगर – गोवा महामार्गांवरील अक्राळी क्रॉजवळ थांबलेल्या ट्रकला ऍक्टिव्हा दुचाकीने धडक दिल्याने पतीचा मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना रात्री घडली. लोंढा पोलिसात या घटनेची नोंद झाली आहे.
दोघेही तीनईघाट (ता. जोयडा ) येथील असून मृत पतीचे ऍंथोनी डीलिमा (35)व जखमी पत्नीचे जास्मिन डीलिमा (32) असे नाव आहे.
गुरुवारी रात्री रामनगर येथील आपली बेकरी बंद करून पती व पत्नी ऍक्टिव्हा दुचाकीवरून सुमारे साडेसात वाजण्याच्या सुमारास तीनईघाट येथे आपल्या घरी जात होते. त्यावेळी अक्राळी क्रॉसजवळ असलेल्या कृष्णा हॉटेल जवळ महामार्गांवर पार्क केलेल्या ट्रकला मागून या दुचाकीने धडक दिली. त्यात ऍंथोनी याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. पत्नीही गंभीर जखमी झाली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी भेट घेऊन त्यांना उपचारासाठी रामनगर सरकारी आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यानंतर बेळगाव येथे उपचारासाठी पाठवण्यात आले. त्यावेळी वाटेतच ऍंथोनी यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद लोंढा पोलीस स्थानकात झाली आहे.
दुदैवी अंत..
ऍंथोनी हा विदेशात कामाला होता, लग्न झाल्यानंतर गावी येऊन त्याने रामनगर येथे बेकरी सुरु केली होती. मात्र रात्री त्याच्यावर काळाने घाला घातला. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
गोव्यातील कचरा बेळगावकडे?
वाहन नादुरूस्त ल्याने कचरा विखुरण्याचा प्रकार उघडकीस समांतर क्रांती / खानापूर खानापूर – लोंढा महामार्गावर कचरा विखरून पडण्याच्या घटनांनी नागरीक त्रस्त झाले आहेत. सदर कचरा गोव्याहून बेळगावच्या दिशेने जात असल्याचे उघडकीस आले आहे. होनकलजवळ एक कचरावाहू ट्रक नादुरूस्त झाल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, प्रशासन मात्र अजुनही या प्रकाराबद्दल अनभिज्ञ असल्याचे दिसते. गेल्या महिनाभरापासून […]