समांतर क्रांती / खानापूर
अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेले सखाराम महादेव गावकर यांचा पाय निकामी झाला आहे. त्यांच्या उपचारासाठी निधी देण्यास वनखात्याने चालढकल चालविली आहे. परिणामी, त्यांच्या कुटुंबीयांवर आर्थिक संकट ओढवले आहे. याची माहिती मिळताच ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. ईश्वर घाडी यांनी सखाराम यांची रुग्णालयात भेट घेऊन त्यांना रु. ५००० ची आर्थिक मदत केली. तसेच त्याना कृत्रिम पाय बसविण्याचा संपूर्ण खर्च उचलण्याची ग्वाही ॲड. घाडी यांनी दिली. यावेळी त्यांच्यासमवेत ग्रा.पं.सदस्य संघाचे अध्यक्ष विनायक मुतगेकर उपस्थित होते.
कचऱ्यांचे ढिगारे, दुर्गंधी आणि डासांचा प्रादूर्भाव..
समांतर क्रांती / खानापूर खानापूर शहर चारही बाजूनी अफाट पसरत आहे. शहराला लागून असलेल्या उपनगरांची संख्या दिवसेदिवस वाढत चालली आहे. पण, या उपनगरांना मुलभूत सुविधा पोहचविण्यात नगर पंचायत आणि ग्राम पंचायती अपयशी ठरल्या आहेत. परिणामी, शहरालगतच्या लाखोंचा महसूल मिळवून देणाऱ्या पॉश नगरांमध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. खानापूर शहर नगर पंचायत अखत्यारीत […]