खानापूर: येथील म.ए. समिती कार्यालयासमोरील नामफलक आज पुन्हा हटविण्यात आला. मराठी मते केवळ समितीलाच मिळणार असल्याने हा अट्टाहास चालला असल्याचे आता स्पष्ट झाले असून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
बेळगाव-पणजी महामार्गावर गणपती मंदिरच्या बाजूला समितीचे संपर्क कार्यालय आहे. पहिल्यांदा नगर पंचायतीची परवानगी नसल्याचे कारण दाखवून फलक काढण्यात आला. त्यावेळी कार्यकर्त्यांनी त्याला आक्षेप घेतला नाही. रितसर परवानगी घेऊन पुन्हा फलक लावण्यात आला. पण काही दिवसांनी फलकाचा आकार निवडणूक आयोगाच्या मार्गसुचिनुसार नसल्याचे कारण देऊन काढण्यात आला. पुन्हा फलक लावला तर त्यालाही विनाकारण आक्षेप घेऊन काढण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले. परिणामी, अधिकाऱ्यांनी पळ काढला होता.
आज मंगळवारी (२५) पुन्हा अधिकाऱ्यांना अचानक पोटशूळ उठला. प्रचंड पोलिस बंदोबस्तात हा फलक विनाकारण हटविण्यात आल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी रास्तारोको केला. निवडणूक अधिकारी वा पोलिसांनी फलक हटविण्याचे कोणतेही रास्त कारण दिलेले नाही. त्यामुळे मराठी मते मिळणार नसल्याने पोटशूळ उठलेल्या राष्ट्रीय पक्षांचे हे कारस्थान असल्याचे स्पष्ट झाले आहे. मराठी भाषिकांतून याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.
पाच वर्षात डॉ.अंजली निंबाळकरांची संपत्ती वाढली की घटली?
विशेष / चेतन लक्केबैलकर लोकप्रतिनिधी, राजकीय नेत्यांची संपत्ती हा सर्वसामान्यांच्या कुतुहलाचा विषय असतो. दर पाच वर्षांनी होणा-या निवडणुकांवेळी उमेदवारांना त्यांच्या मालमत्तेचा तपशील द्यावा लागतो. ब-याचवेळा हा तपशिल प्रसार माध्यमातून प्रसिध्दही होतो. यंदाच्या निवडणुकीसाठी रिंगणात असलेल्या खानापूर तालुक्यातील प्रमुख उमेदवारांच्या मालमत्तेत गेल्या पाच वर्षात किती वाढ आणि किती घट झाली, याबाबतचा हा विशेष रिपोर्ट… आमदार, खासदार […]