समांतर क्रांती / खानापूर
गृहमंत्री अमित शहा यांनी घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केले आहे. त्याच्या निषेधार्थ येथील डॉ. बाबासेब आंबेडकर उद्यान ते शिवस्मारक चौकापर्यत प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून अमित शहांचा निषेध नोंदविण्या आला. आज शुक्रवारी (ता.२०) खानापूर तालुक्यातील विविध दलित संघटनेच्यावतीने राजा श्री शिवछत्रपती चौकात रास्ता रोको व जोरदार निदर्शने करण्यात आली.तसेच ना. अमित शहा यांच्या प्रतिकृतीचे दहण करण्यात आले व तहसीलदार प्रकाश गायकवाड यांना निवेदन सादर केले.
यावेळी दलित संघटनेचे नेते राजशेखर हिंडलगी म्हणाले, डॉ. बाबासाहेबांनी देशाला केवळ संविधानच दिले नाही तर सर्व जाती-धर्मातील जनतेला जगण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. त्यांना त्यांच्या अधिकार आणि हक्कांची जाणिव करून दिली आहे. असे असतांना गृहमंत्री बेताल वक्तव्य करून मनुस्मृतीचे जाहीरपणे समर्थन करतात. त्यांना त्या पदावर राहणाच्या नैतीक अधिकार नाही. त्यांना तात्काळ पायउतार करावे.
नगरसेवक लक्ष्मण मादार यांनी अमित शहा यांचा निषेध करून भाजपने आतापर्यंत डॉ. बाबासाहेब आणि संविधानाचा तिरस्कार केला आहे. आता तर अमित शहा यांनी जाहीरपणे त्याची वाच्यता केली असून या भाजप सरकारला संसदेबाहेर हलकण्याची वेळ आली आहे. जर अमित शहांना तात्काळ पायउतार न केल्यास देशातील डॉ. आंबेडकरप्रेमी पेठून उठतील, अशा इशारा दिला.
प्रसंगी अमित शहा आणि भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी दलित संघटनेचे पदाधिकारी मल्लेशी पोळ, सुरेश शिंगे, राघू चलवादी तसेच दलित संघटनेचे पदाधिकारी व महिला तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार सी.टी.रवी यांना दिलासा; विशेष न्यायालयाकडून सशर्त जामीन
समांतर क्रांती / बंगळूर महिला आणि बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यावर अश्लिल टिप्पणी केल्याप्रकरणी आज शुक्रवारी (ता.२०) लोप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने विधान परिषद सदस्य सी.टी.रवी यांना सशर्त जामीन मंजूर केला. त्यांच्या सुटकेचा अंतरिम आदेश न्यायालयाने बजावला. सकाळी आमदार सी.टी.रवी यांना येथील जेएमएफसी न्यायालयात हजर करण्यात आले होते. सदर दावा लोकप्रतिनिधींच्या सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आला. […]