An incident has taken place near Buldhana where 25 passengers died after the bus caught fire after an accident.
समांतर क्रांती वृत्त
बुलढाणा: महाराष्ट्रातील बुलढाण्याजवळ लग्नासाठी निघालेल्या बसला अपघातानंतर लागलेल्या आगीत २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात समृध्दी महामार्गावर रात्री १.३५ वाजण्याच्या सुमारास घडल्याचे सांगितले जात आहे, या बसमध्ये एकूण ३३ प्रवासी प्रवास करत होते. त्यातील २५ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. ही बस नागपूरहून पुण्याला जात असताना हा अपघात झाला.पावसामुळे चालकाला अंदाज न आल्याने बस रस्त्याशेजारील धडकली. त्यामुळे बस कलंडली आणि डिझेलचा टॅंक फुटल्याने बसला आग लागली. परिणामी, बसमधून कुणालाच बाहेर पडता न आल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याचे म्हटले जात आहे. जखमींना उपचारासाठी बुलढाणा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. बसमधून आठ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
ग्रा.पं.अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणूक प्रक्रियेला सुरवात
समांतर क्रांती न्यूज खानापूर: ग्रा.पं.च्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीसाठीच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. लवकरच प्रत्येक पंचायतीच्या निवडणुकीसाठीची तारीख जाहीर होणार असून तत्पूर्वी ५१ ग्रा.पं.च्या निवडणुकीसाठी नोडल अधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. दि. १९ जून रोजी खानापूर तालुक्यातील ग्रा.पं.च्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीसाठीचे आरक्षण जाहीर झाले होते. त्यानंतर निवडणूक कधी होणार याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, नोडल […]