- कारवार: आवघ्या दीड वर्षात ज्यांचे केंद्रीय राज्य मंत्रीपद खालसा झाले, ते खासदार अनंतकुमार हेगडे सध्या लोकसभा निवडणुकीपासून लांब आहेत. मोंदींनी त्यांचे मंत्रीपद खाल्ले अशी अटकळ असल्याने ते गेल्या पाच वर्षात मुख्य प्रवाहातून बाहेर होते. आता रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी शिरसीत येणार आहेत, तेव्हा तरी ते मोदींना सामोरे जाणार की त्यांना साफ ‘हात’ दाखवणार याकडे स्थानिक कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
निवडणूक प्रक्रियेला सुरूवात झाल्यापासून खासदार हेगडे हे बंद दाराआडून राजकारणाचे पत्ते पिसत आहेत. शिरसीतून त्यांना भाजपला एकही मत मिळवून द्यायचे नाही. कारण, माजी मंत्री विश्वेश्वर हेगडे – कागेरी हे त्यांचे पारंपारिक राजकीय शत्रू आहेत. त्यातच अनंतकुमार यांची प्रतिमा मलिन करण्यात कागेरींनी महत्वाची भूमीका बजावली असल्याचा आळ आहे. त्यामुळे २८ रोजी हेगडेंच्या घरासमोरील मैदानात होणाऱ्या पंतप्रताधान मोंदींच्या सभेला ते उपस्थित राहणार की, त्यांना त्याच दिवशी राजकीय आजार जडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे.
खासदार हगडे हे पुन्हा एकदा संसदेत जाण्याच्या तयारीत असतांनाच त्यांचा पत्ता कापला गेला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषेदेतून भाजपच्या राजकारणात आलेले खासदार हेगडे यांना भाजपने आवघ्या वर्षभरात मंत्रीपदावरून कोलल्याने ते दुखावले आहेत. त्याचे उट्टे काढण्याची संधी शोधत असतांनाच त्यांना यावेळच्या लोकसभा निवडणुकीत त्यांची उमेदवारी कापून त्यांना नारळ देण्यात आला. हे कमी होते म्हणून की काय त्यांचे पारंपारीक विरोधक कागेरींना उमेदवारी देण्यात आल्याने ते पराकोटीचे दुखावले आहेत. त्यांच्या स्वकीयांनी दिलेल्या माहितीनुसार आता ते एकवेळ काँग्रेसला मदत करतील पण, भाजपला मदत करणार नाहीत.
एकुणच काय तर खासदार हेगडे हे ‘हाता’ला साथ देण्याच्या मनस्थितीत आहेत, असे समजते. एकुणच त्यांचे आठही विधानसभा मतदार संघातील कार्यकर्ते एकवटले तर डॉ. .अंजली निंबाळकर यांना विजयी होण्यापासून कुणीच रोखू शकणार नाही, असा काँग्रेसींचा होरा आहे.
मराठ्यांनो, आता तरी शहाणे व्हा!
समांतर क्रांती विशेष ज्यांनी महाराष्ट्र धर्म वाढावा, यासाठी जीवाची बाजी लावली, त्या शहाजी राजेंची समाधी कर्नाटकाच्या कुशीत आहे. त्यांच्यासमवेत कर्नाटकात आलेले तत्कालीन मराठे कर्नाटकातच राहिले. महाराष्ट्र, मध्यप्रदेशसह विविध राज्यात मराठा समाज मोठ्या संख्येने आहे. पण, इतर राज्यांच्या तुलनेत कर्नाटकात जेवढा अन्याय मराठा समाजावर झाला आहे, तेवढा क्वचीतच अन्य समाजावर झाला आहे. भाजपने तर कळसच केला […]