समांतर क्रांती वृत्त
बिडी: खानापूर तालुक्यातील अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूरस्थितीमुळे संपूर्ण तालुका बेहाल झाला आहे. या स्थितीची पाहणी करण्यासाठी आलेले पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सतिश जारकीहोळ्ळी यांनी भुरूणकी गावात घरांची पडझड झालेल्यांची भेट घेतली. त्यांना तात्काळ एक लाख विस हजारांचा धनादेश त्यांनी वितरीत केला. यावेळी हातात धनादेश देताच नुकसानग्रस्त खैरुनिसा अब्दुलगणी हेरेकर यांना रडू कोसळले. माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी पुढे होत, त्यांना मिठी मारून त्यांचे सांत्वन केले.
खानापूर तालुका हा जिल्ह्यातील सर्वाधिक पावसाचा तालुका आहे. सध्याच्या पावसाने जनजीवन विस्कळीत होऊन सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. त्याची पाहणी करण्यासाठी आलेले पालकमंत्री सतिश जारकीहोळ्ळी यांनी भुरूणकी गावाला भेट दिली. तेथील पडझड झालेल्या घरांची पाहणी करून संबंधीतांना तात्पुरता आसरा निर्माण करून देण्याची सूचना संबंधीत अधिकाऱ्यांना केली. घरांची पडझड झाल्यास तात्काळ दोन लाख विस हजारांचे अर्थसहाय्य केले जात असून संपूर्ण घर कोसळल्यास पाहणी करून पाच लाखांचे अर्थसहाय्य करण्यात येईल, असे ना.जारकीहोळ्ळी यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार विठ्ठल हलगेकर, जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रस्त्यांची समस्या मार्गी लावू
तालुक्यातील रस्त्यांची दूरवस्था झाल्याची माहिती मिळाली आहे. सध्या तात्पूरती डागडूजी केली जाईल. नोव्हेंबर महिन्यात रस्त्यांचा आढावा घेऊन तालुक्यातील सर्व रस्त्यांची समस्या मार्गी लावू, असे ना. जारकीहोळ्ळी यांनी यावेळी सांगितले.
दूधसागरजवळ दरड कोसळली, रेल्वे वाहतूक ठप्प
समांतर क्रांती वृत्त A landslide occurred near Dudhsagar, railway traffic stopped कॅसलरॉक: दूधसागरला जाणाऱ्या रस्त्यावर कॅसलरॉक पासूनच्या तिसऱ्या बोगद्याजवळ दरड कोसळली आहे. रेल्वे वाहतूक सायंकाळपासून बंद आहे. त्यामुळे कांही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर कांही दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आल्या आहेत, अशी माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे. दुपारी कॅसलरॉकपासून तिसऱ्या बोगद्याजवळ रेल्वे रूळावर दरड […]