समांतर क्रांती / खानापूर
अंगणवाडी घोटाळ्यातील संशयित आरोपी आकाश अथणीकर हा वकील नसल्याचा खुलासा खानापूर वकील संघटनेने केला आहे. यासंदर्भात आज सोमवारी (ता.16) वकील संघटनेचे अध्यक्ष ईश्वर घाडी यांनी खानापूर पोलिसांना पत्र दिले आहे. पत्रात, आकाश अथणीकर याने तो वकील असल्याचे त्याच्या फेसबुकसह विविध सोशल मीडिया हॅण्डल्सवर लिहिले आहे. तो वकील नसतानाही त्याने वकिलाचा पेहराव करून खोटी माहिती पसरविली आहे. याच माध्यमातून तो फसवणूक करीत असून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी असे अध्यक्ष ईश्वर घाडी यांनी म्हटले आहे.
भाजपचा कायदा सेल संचालक
आकाश हा भाजपचा कायदा सेल संचालक आहे. तो वकील नसतानाही भाजपने त्याची या पदावर वर्णी लावली. तेवढंच नाही तर त्यांच्या एका पदाधिकाऱ्याने एवढा मोठा घपला केल्यानंतरही भाजपकडून याबाबत खुलासा करण्यात आलेला नाही. त्यामुळे भाजप त्याला पाठीशी घालत आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आकाश याने त्याच्या फेसबुक अकाउंटवर जिल्हा न्यायालयाचा वकील असल्याची नोंद केली आहे.
TOWN PANCHAYAT : निवडणूक होणार की सर्वोच्च न्यायालयात जाणार?
समांतर क्रांती / खानापूर नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष निवडणुकीला उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने दिलेली स्थगिती उठविण्यात आली आहे. त्यामुळे नगरसेवकांची प्रतिक्षा संपली असली तरी या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा निर्णय व्यक्त केला आहे. पुन्हा इच्छूकांच्या उत्साहावर विरजन पडले आहे. Khanapur Nagar Panchayat President-Vice President Election नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष दोन्ही जागांसाठी सामान्य महिला आरक्षण जाहीर झाले होते. त्यामुळे […]