इदलहोंड येथे यशवंत बिर्जेंचे आवाहन; शिवारात जाऊन घेतल्या महिलांच्या भेटी
खानापूर: राज्यात काँग्रेस सरकारने महिलांसाठी अनेक योजना लागू केल्या आहेत. प्रत्येक वर्षाला प्रत्येक महिलेच्या बॅंक खात्यात २४ हजार रुपये जमा होत आहेत. बस प्रवास मोफत आहे. वीजबिल माफ आहे. कारवार लोकसभा मतदार संघातून पहिल्यांदाच खानापूरच्या डॉ. अंजली निंबाळकर या महिला उमेदवार उभ्या आहेत. महिलांच्या समस्या दिल्लीच्या संसदेत मांडण्यासाठी त्यांचे हात बळकट करा, असे आवाहन यशवंत बिर्जे यांनी इदलहोंड येथे केले.
उमेदवार डॉ. निंबाळकर यांनी शिवारात काम करणाऱ्या महिलांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. एका शिवारात काम करणाऱ्या महिलांसमोर बोलतांना श्री. बिर्जे यांनी भाजपच्या आमिषांना बळी पडू नका. तालुक्यातील मराठी भाषिक महिला संसदेत पाठविण्यासाठी सर्व महिलांनी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे. तालुक्याच्या विकासासाठी त्यांना निवडून देण्याची गरज आहे. भाजपकडून हिंदुत्वाच्या नावाखाली दिशाभूल केली जात आहे. आपण सगळेच हिंदू आहोत. रामनवमीच्या दिवशी डॉ. अंजली निंबाळकर या तुम्हाला विकासाची ग्वाही देत आहेत. त्याची पूर्तता त्या नक्कीच करतील. त्यासाठी त्यांना यावेळी भरघोस मतदान करून संसदेत पाठविण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे.
यावेळी बोलतांना उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांनी विरोधकांकडून आरोप केले जाणे हे राजकारणात स्वाभाविक आहे. त्यातही भाजपकडे विकासाचा मुद्दा नाही. काँग्रेसने राज्यात निवडणुकीत जी अश्वासने दिली ती महिनाभरात पूर्ण केली. त्यामुळे यावेळी भाजपचे कुठलेच उमेदवार निवडून जाणार नाहीत. आम्ही अश्वासन दिल्याप्रमाणे महिलांना प्रत्येक महिन्याला दोन हजार रुपये देत आहोत. बसचा प्रवास मोफत असल्याने महिलांना दिलासा मिळाला आहे. भाजपच्या केंद्रातील सरकारने मात्र माझ्या माता-भगिणींच्या डोळ्यात पाणी आणले आहे. महागाई आभाळाला भिडली आहे. गोरगरीबांना जगणे मुश्किल झाले आहे. अशा या भाजप सरकारला हद्दपार करण्यासाठी महिलांनी पुढाकार घेत काँग्रेसला मतदान करावे, असे आवाहन केले.
यावेळी उपस्थित महिलांनी डॉ. निंबाळकर यांना एकमुखी पाठींबा जाहीर करीत प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला. डॉ. निंबाळकर यांनी आज बुधवारी (ता.१७) निट्टूर, हलकर्णी, इदलहोंड ग्राम पंचायत हद्दीतील गावांना भेटी देऊन मतदारांच्या भेटी घेतल्या. त्यांनी गावात प्रचार फेरीसह शिवारात आणि वीट भट्ट्यांवर काम करणाऱ्या मजुरांच्याही भेटी घेतल्या. त्यांच्या समस्या जाणून घेत आगामी काळात त्या समस्या सोडविण्याची ग्वाही त्यांनी दिली.
हेही वाचा..
डॉ. अंजली निंबाळकर यांचा आज जांबोटी-कणकुंबी भागात प्रचार दौरा
खानापूर: आज गुरूवारी (ता.१८) काँग्रेसच्या लोकसभा उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर या जांबोटी- कणकुंबी भागात प्रचार दौरा करणार आहेत. त्यांनी नागरीकांच्या भेटी घेण्यावर भर दिला असून या भागातील प्रत्येक गावात जाऊन त्या मतदानासाठी आवाहन करणार आहेत. जांबोटी-कणकुंबी भागातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रचार दौऱ्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. चिगुळे, कणकु्बी, पारवाड, चिखले, आमटे, कालमणी, जांबोटी, हबनहट्टी, […]