समांतर क्रांती / प्रासंगिक
खानापूर तालुका हा दाट जंगलाने व्यापलेला आहे. आवघ्या तालुक्यात वन्यप्राण्यांचा अधिवास आहे. जेवढे वन्य प्राणी आहेत, कमी-अधिक तेवढे वन्यप्राणीदेखील आहेत. साहजिकच अनेकवेळा माणूस आणि वन्यप्राण्यातील संघर्ष हा पाचविला पुजला आहे. पण, स्वत:हून वन्य प्राण्यांचे संकट ओढवून घेणाऱ्यांची किव करावी, अशी सद्यस्थिती आहे.
दिवसाढवळ्या जनवस्तीजवळ, रानवाटेवर मुक्त संचार करणाऱ्या हत्ती, वाघ, बिबटे, अस्वलांसह गवीरेड्यांचे अनेकांना कुतूहल वाटते. त्यामुळेच की काय त्यांचे फोटो टिपण्यासाठी अनेकजण जीव धोक्यात घालायलादेखील मागे-पुढे पाहत नाहीत. असाच प्रकार आज मंगळवारी (ता.७) तालुक्यातील हुळंद-कणकुंबी मार्गावर घडली, असल्याची चर्चा आहे. मुक्तसंचार करणाऱ्या पट्टेरी वाघाचा फोटो काढण्यासाठी एका प्रवाशांने चक्क त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केल्याच्या बातम्या प्रसिध्द झाल्या आहेत. तसा कथीत व्हीडीओदेखील प्रसारमाध्यमावर व्हायरल झाला आहे. त्या प्रवाशांच्या धाडसाचे कौतूक होत असले तरी हा आतताईपणा असल्याचे त्यांच्या वर्तणुकीतून दिसून येत आहे.
नुकताच गोल्याळीजवळ दोघा तरूणांना पट्टेरी वाघाचे रस्त्यावर दर्शन घडले होते. त्या दोघा दुचाकीस्वारांनी प्रसंगावधान राखल्याने दुर्घटना टळली होती. अलिकडे वन्यप्राण्यांनी हल्ला केल्याने अनेक शेतकरी जायबंदी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. नुकताच मान येथील सखाराम महादेव गावकर यांच्यावर अस्वलाने केलेल्या हल्ल्यात त्यांना पाय गमवावा लागला आहे. शेतीत काम करतांना ही घटना घडली. त्याला नाईलाज होता. पण, हुळंद – कणकुंबी मार्गावर केवळ वाघाच्या फोटोसाठी प्रवाशी चक्क वाघाला डिवचतांना दिसत आहेत. ही बाब ‘आ बैल मुझे मार’ अशीच आहे. आपल्या मार्गाने निघालेल्या वाघाला डिवचतांना हौस भागवून घेतली. पण, त्याचवेळी त्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला असता तर..
वन्यप्राण्यांकडून हल्ले झाल्यास वनखात्यावर आळ घेण्याची जणू फॅशन बनली आहे. प्रत्यक्षात वन्य प्राण्यांच्या अधिवासातील हस्तक्षेप वाढला आहे, त्याचाच हा परिपाक आहे, याची जाणीव कधी होणार? आमटेसारख्या संरक्षीत जंगल भागात बिनबोभाट विनापरवाना आणि बेकायदा रिसॉर्ट उभारले जात आहेत. भीमगड अभयारण्यात फार्महाऊसच्या नावाखाली अनेक अवैध उद्योग फोफावले आहेत. परिणामी, वन्यप्राणी त्यांच्या अधिवासातून बाहेर पडून मुक्तपणे संचार करीत आहेत.
एकतर मानवी हस्तक्षेपामुळे वन्यप्राणी जंगलाबाहेर पडत आहेत. त्यांची त्यांच्या अधिवासात सोय करण्याची जबाबदारी वनखाते घेत नाहीत, हे यामागील प्रमुख कारण आहे. शिवाय बेकायदा हस्तक्षेपाला वनाधिकाऱ्यांचा वरदहस्त लाभला आहे, हेदेखील एक कारण आहे. स्थानिकांना वन्यप्राण्यांपासून बचावाबाबत माहिती असते. पण, केवळ फोटोसाठी अततायीपणा करणाऱ्यांना याची यत्कींचीत कल्पना नसते. त्यामुळे ऐनवेळी केलेले अवाजवी धाडस अंगावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही.
खानापूर तालुक्यात सध्या वनक्षेत्रातील हस्तक्षेप वाढला आहे. उथळ पर्यटक आणि उतिउत्साही लोकांकडून वन्यप्राण्यांना डिवचले जाते. त्याच रागात या प्राण्यानी स्थानिक शेतकऱ्यांवर प्राणघातक हल्ले केल्याच्या घटना ताज्या आहेत. त्यांना कुणाला जबाबदार धरायचे? हा मुख्य प्रश्न आहे. त्यामुळेच कणकुंबी-हुळंद मार्गावरील वाघाच्या कथीत चित्रीकरणाचे समर्थन करता येत नाही. असे हे वनखात्याच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या वरदहस्ताशिवाय अशक्यच आहेत.तरीही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वाघासारख्या हिस्त्र प्राण्यांना डिवचण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. तरच वन्यप्राणी आणि सामान्य जनतेतील संघर्षाला खीळ बसेल.
VIDEO: खानापुरातील जंगलात पोलिस कर्मचाऱ्यांची ‘ओली पार्टी’
समांतर क्रांती / खानापूर खानापूर तालुक्यातील राखीव जंगलात पोलीस कर्मचाऱ्यांच्या टोळक्याने पार्टी केल्याने वादाला तोंड फुटले आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड केला असून आता व्हायरल होत आहे. एका आठवड्यापासून चर्चेत असलेल्या व्हिडिओमध्ये सुमारे १२ ते १५ पोलिस कर्मचारी परवानगीशिवाय संवेदनशील वनक्षेत्रात प्रवेश करताना दिसत आहेत. त्यांनी आग पेटवून अन्न शिजवले आणि मद्यपान […]