
समांतर क्रांती / खानापूर
जंगली डुक्कराची शिकार केल्याप्रकरणी नागरगाळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी हलशीवाडी येथील अर्जून देवाप्पा देसाई (५८) यांना आज गुरूवारी (ता.१६) सकाली अटक केली आहे.
नागरगाळी वनविभागाला मिळालेल्या माहितीवरून सकाळी ८.४५ वाजता संशयीत आरोपी अर्जून देसाई यांच्या घरावर छापा मारण्यात आला. यावेळी त्यांच्याकडे डुक्कराचे दोन किलो मांस आढळले. मांसासह त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी डुक्कराची शिकार केल्याचे मान्य केल्याने त्यांच्यावर वन्य जीव संरक्षन कायदा १९७२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई नागरगाळी वनविभागाचे उपवनसंरक्षक शिवानंद मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल प्रशांत मंगसुळी, मेरडा वनपरिक्षेत्राचे सहायक वनक्षेत्रपाल एस.जी.हिरेमठ आणि हलगा येथील वनपाल विजयकुमार कौजलगी यांनी केली.

कडकडीत हरताळ पाळा: खानापूर म.ए.समितीचे आवाहन
समांतर क्रांती / खानापूर उद्या शुक्रवारी (ता. १७) हुतात्मा दिली खानापूर तालुक्यातील जनतेने व्यवसाय बंद ठेवून कडकडीत हरताळ पाळावा, असे आवाहन म.ए.समितीच्यावतीने करण्यात आले आहे. सकाळी ८.३० वाजता स्टेशन रोडवरील हुतात्मा नागाप्पा होसूरकर स्मारकासमोर सीमालढ्यातील हुतात्म्यांना अभीवादन करण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. उद्या मध्यवर्ती म.ए.समितीच्यावतीने कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे […]