विरोधकांना पळती भूई थोडी; अध्यक्षपदासाठी चुरशीची लढत
समांतर क्रांती वृत्त
खानापूर : हलशी ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत अध्यक्षपदी पांडुरंग लक्ष्मण बावकर यांनी विजय मिळविला आहे. तर उपाध्यक्षपदी आश्विनी देसाई यांची अविरोध निवड झाली. या निवडणुकीत अकरा पैकी सहा मते मिळवून पांडूरंग बावकर यांनी बऱ्याच वर्षापासून पंचायतीवर कब्जा केलेले केएलई संस्थेचे संचालक संतोष हंजी यांचा दणदणीत पराभव केला. विशेष म्हणजे कर्नाटकाच्या एका मंत्र्यांच्या हस्तकांनी या निवडणुकीत ढवळाढवळ करून पुन्हा सत्तासंसार थाटण्याचा आटोकाट प्रयत्न केला. बेळगाव तालुक्यातून त्यांच्या ‘मदमस्त’ समर्थकांनीही बरीच ‘मेहनत’ घेतली. पण, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, भाजप नेते माजी आमदार अरविंद पाटील यांनी नेहमीप्रमाणेच ‘भायल्यां’ना त्यांची जागा दाखवून देत सत्तांतर करण्यात यश मिळविले. अलिकडेच त्यांनी विविध कृषी पत्तीन संघावरील त्यांचे वर्चस्व सिध्द केले आहे. आता अनेक पंचायतींवर त्यांनी आपला झेंडा रोवण्यास सुरूवात केली असून त्यांचे तालुक्यातील राजकारणातील स्थानमान भक्कम होत असल्याचे दिसून येत आहे.
हलशी ग्राम पंचायतीच्या निवडणुकीसाठी कडकोट पोलीस बंदोबस्तासह विरोधकांनी चक्क मंत्र्यांचे ‘वजन’ वापरून मोठा समुदाय जमविला होता. पण, नेहमीप्रमाणेच बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माजी आमदार अरविंद पाटील यांनी विरोधकांचा डाव उधळून लावत पांडुरंग बावकर यांना विजयी केले. तर उपाध्यक्षपदी अश्विनी देसाई यांची बिनविरोध निवड केली. काँग्रेसचे युवा नेते मृणाल हेबाळकर यांनी सुद्धा हलशी येथे उपस्थित राहून संतोष हंजी यांच्या विजयासाठी प्रयत्न चालविले होते. पण, त्यांना आल्या पावली ‘हात’ हलवीत परतावे लागले. तालुक्यात आमचेच वर्चस्व आहे, आम्ही स्थानिकांना न्याय देण्यासाठी आणि तालुक्याच्या विकासासाठी कार्यरत आहोत. त्यामुळे कुणीही येथील राजकारणात ढवळाढवळ करून वातावरण बिघडण्याचा प्रयत्न केल्यास स्थानिक जनताच त्यांना धडा शिकवेल. तेच हलशीच्या निवडणुकीतून स्पष्ट झाले आहे, असे माजी आमदार अरविंद पाटील यांनी ‘समांतर क्रांती’शी बोलतांना सांगितले.
आमटे ग्रा.पं.अध्यक्षपदी सरस्वती भरणकर
समांतर क्रांती वृत्त जांबोटी: तालुक्यातील आमटे ग्राम पंचायतीच्या अध्यक्षपदी सरस्वती कृष्णा भरणकर तर उपाध्यक्षपदी लक्ष्मण बाळकृष्ण गुरव यांची अविरोध निवड झाली. अध्यक्षपदासाठी अवर्ग महिलेसाठी आरक्षण जाहीर झाले होते. सरस्वती भरणकर या एकमेव असल्याने त्यांना संधी मिळाली. तर उपाध्यक्षपदासाठी मागासवर्गीय आरक्षण होते. सदस्यांनी एकमतांने लक्ष्मण बाळकृष्ण गुरव यांना उपाध्यक्ष म्हणून संधी दिली. निवडणूक अधिकाऱ्यांनी निवड जाहीर […]