खानापूर: कुठेही एखादी दुर्घटना घडली की, तेथे माजी आमदार अरविंद पाटील जणू देवदूत बनून हजर होतात. स्वत:चे कितीही महत्वाचे काम असो, ते कुणालाच टाळत नाहीत. त्याची प्रचिती तालुकावासीयांना पुन्हा-पुन्हा येते. शुक्रवारी त्याची पुन्हा अनुभुती आली. नंदगड मार्केटिंग सोसायटीजवळ लग्नाला जायला उशिर झाल्याने गडबडीत चालत जाणाऱ्या जटगे येथील व्यंकाप्पा महादेव तीनेकर (वय ७५) वृध्दाचा पाय वाटेत आडव्या आलेल्या खांबाला आदळल्याने त्यांच्या पायाचे हाड मोडले. व ते खाली कोसळले. नंदगड मार्केटिंग सोसायटीचे चेअरमन व माजी आमदार अरविंद पाटील नेमके त्याच वेळी सोसायटीत बसले होते. याची बातमी समजतात ताबडतोब त्यांनी त्याठीकाणी धाव घेतली. सदर वृद्धास स्वत: उचलून आपल्या गाडीत घेतले व थेट खानापूर प्राथमिक आरोग्य गाठले. डॉक्टरांनी त्याच्यावर प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी बेळगावला पाठविले. सदर वृद्धाच्या उजव्या पायाचे हाड गुडघ्याच्या खाली मोडले असुन प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, माजी आमदार अरविंद पाटील यांनी वेळीच त्यांना इस्पीतळात हलविल्याने वेळेत उपचार झाल्याने जखमी वृध्दाच्या कुटुंबीयांनी त्यांचे आभार मानले.
बेळगाव जिल्हा शिवसेनाप्रमुखांच्या मुलाची आत्महत्या
बेळगाव: जिल्हा शिवसेना प्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या मुलाने लग्न झाल्याच्या अवघ्या महिनाभरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. प्रतीक प्रकाश शिरोळकर (वय 29), आर्किटेक्चर मूळ रा. कोनवाळ गल्ली, सध्या रा. गणेशपूर बेळगाव असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.याबाबतची सविस्तर माहिती अशी, महिन्याभरापूर्वीच प्रतिकचा विवाह झाला होता. घरातील सर्व मंडळी खोलीत असताना, अचानक […]