- खानापूर: मी पाटलांच्या घरात जन्माला आलोय, हलगेकरांशी गध्दारी करणार नाही. तालक्यातून ‘ब्रिटिशां’ना हाकलून लावणे हेच एकमेव ध्येय आहे, असे मत माजी आमदार अरविंद पाटील यांनी भाजपच्या प्रचारसभेत व्यक्त केले आहे. भाजपकडून सध्या विरोधकांवर हल्लाबोल करणारे ते एकमेव नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या सभा भाव खाऊन जात आहेत. माजी केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांच्या सभेत त्यांनी विरोधी काँग्रेसवर तोफ डागली.
गेल्या पाच वर्षात तालुक्यात विकासाच्या नावाखाली काय झाले, हे तालुक्यातील जनतेने अनुभवले आहे. मागील निवडणुकीत आमच्या चुकांमुळेच बाहेरच्यांचे फावले. पण यावेळी ती चूक करायची नाही. महिलांनी यावेळी तालुक्याच्या विकासाचा विचार करून तालुक्यातीलच उमेदवाराला निवडून द्यावे. प्रत्येक गोष्ट माझ्यामुळेच झाली असा आव आणणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देऊ. त्या ‘ब्रिटिशां’ना तालुक्याबाहेर हकलून लावू, असे सांगितले.
मी प्रामाणिकपणे प्रचार करीत असूनही माझ्याबाबत वावड्या उठविल्या जात आहेत. मी पाटलांच्या घरात जन्माला आलोय. गध्दारी करणार नाही, असाही दावा त्यांनी यावेळी केला.
प्रमोशन की अविश्वास?
आधीच अरविंद पाटील यांनी प्रामाणिकपणे प्रचार करीत असल्याचे सांगूनदेखील स्मृती इराणी यांनी त्यांच्या भाषणावेळी त्यांना समोर येऊन ते हलगेकरांसोबत आहेत, हे सांगण्यास भाग पाडले. त्यांनी अरविंद म्हणजे कमळ आणि कमळ विठ्ठलाच्याच गळ्यात अशी कोटी केली. एकंदर, हे अरविंद पाटलांचे प्रमोशन होते, की त्यांच्यावर अविश्वास व्यक्त केला गेला हे मात्र कुणालाच समजले नाही.
One thought on “पाटलांच्या घरात जन्मलोय, गध्दारी करणार नाही”