समांतर क्रांती / कारण राजकारण – चेतन लक्केबैलकर
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांचे पडघम आतापासूनच वाजू लागले आहेत. काँग्रेस आणि भाजपने उमेदवार निवडीसाठीच्या हालचालींना सुरूवात केली आहे. केवळ हिंदूत्व या मुद्यावर सहावेळा संसदेतील खूर्ची गरम केलेले खासदार अनंतकुमार हेगडे यांना यावेळी भाजपकडून डच्चू मिळणार हे निर्विवादपणे स्पष्ट झाले असल्याने भाजपने नव्या उमेदवाऱाच्या शोधाला सुरूवात केली आहे. कॅनरा लोकसभा मतदार संघावर मराठ्यांनी नेहमीच वर्चस्व सिध्द केले आहे. त्यामुळे यावेळी मराठा उमेदवार देण्यासाठीची चाचपणी भाजप आणि काँग्रेसने चालविली आहे. भाजपकडून खानापूरचे माजी आमदार अरविंद पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. त्याबद्दल खानापूर तालुकावासीयांत उत्सूकता निर्माण झाली आहे.
कॅनरा लोकसभा मतदार संघात खानापूरसह कित्तूर, हल्याळ, यल्लापूर, कारवार, शिरशी, कुमठा, भटकळ या तालुक्यांचा समावेश आहे. येथील आठ विधानसभा मतदार संघापैकी पाच विधानसभा मतदार संघावर काँग्रेसची सत्ता आहेत, तर तीन ठिकाणी भाजपचे वर्चस्व आहे. अशा स्थितीत यावेळची लोकसभा निवडणूक रंगतदार होईल, असा अंदाज आहे. १९९६ नंतर १९९९ ची निवडणूक वगळता आतापर्यंत मतदार संघावर भाजपचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. त्यात खानापूर तालुक्याचे योगदान नेहमीच मोलाचे ठरले. शिवाय या मतदार संघात मराठा आणि कुणबी बहुसंख्य असल्याने यावेळचे उमेदवार निवडीचे आव्हान दोन्ही पक्षांसमोर आहे.
१९६७ साली दिनकरराव देसाई यांना खानापूरकरांच्या सहकार्यामुळे संसदेत ‘एन्ट्री’ मिळाली होती. त्यानंतर १९७७ साली पूर्वाश्रमीचे म.ए.समितीचे आमदार पी.बी.कदम यांनी काँग्रेसकडून खासदारकी मिळविली होती. तीदेखील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या जिवावरच. पुढील प्रत्येक निवडणुकीत खानापूर तालुक्याने महत्वाची भूमिका बजावली. खासदार हेगडे यांना सहा वेळा संसदेत पाठविण्यात खानापूर आणि हल्याळ तालुक्यानी महत्वाची कामगिरी बजावली. पण, ते अपयशी आणि कार्यदिग्मूढ संसदपट्टू ठरले. केवळ हिंदूत्व या मुद्यावर निवडून गेलेल्या हेगडेंनी या मतदार संघासाठी कांहीच केले नाही. शिवाय त्यांची संसदेतील कामगिरीदेखील अदखलपात्र राहिली. मंत्रीपद मिळूनही त्यांना कांहीच साध्य करता आले नाही. केवळ वादग्रस्त विधाने करण्यापलिकडे त्यांचे कांहीच योगदान राहिले नाही. त्यामुळे त्यांना यावेळी नारळ मिळणार हे निश्चित आहे.
भाजपने नव्या उमेदवाराच्या शोधार्थ हालचाली सुरू केल्या आहेत. माजी मुख्यमंत्री रामकृष्ण हेगडे यांचे पणतू शशिधर हेगडे यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. पण, मतदार संघाचा एकंदर इतिहास पाहता या मतदार संघातून मराठा कार्ड वापरले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यादेशेनेही चाचपणी सुरू आहे. दरम्यान, माजी आमदार अरविंद पाटील यांचे नाव पुढे आले आहे. काँग्रेसकडून पुन्हा २०१९ मधील पराभूत उमेदवार आनंद अस्नोटीकरांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता नकारता येत नाही. हल्याळचे आमदार आर.व्ही.देशपांडे यांनाही राज्याच्या राजकारणातून हद्दपार करण्यासाठी त्यांच्या माथ्यावर खासदारकी उमेदवारी मारली जाण्याची शक्यता आहे. २०१४ साली त्यांचे सुपुत्र प्रशांत देशपांडेंना उमेदवारी देण्यात आली होती. पण, त्यांनी सपाटून मार खाल्ला होता. हल्याळ आणि एकुणच कारवार लोकसभा मतदार संघावरील आपला वचक कायम राखण्यासाठी आमदार देशपांडे यांनी पुन्हा तसा प्रयत्न टाळला. आता तर प्रशांत देशपांडे हे राजकारणापासून बरेच दूर आहेत.
विधानसभेच्या निवडणुकांनंतर लोकसभेच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. खानापूर मतदार संघावर भाजपचे वर्चस्व असले तरी आवघ्या तीन महिण्यात आमदार विठ्ठल हलगेकरांनी मतदारांसह भाजपच्या समर्थकांची घोर निराशा केली आहे. त्यातुलनेत माजी आमदार अरविंद पाटील यांनी तालुक्यातील बहुतेक स्वराज्य संस्था, सहकारी संस्थावर आवघ्या दोन महिन्यात त्यांचे वर्चस्व सिध्द करीत भाजपच्या हायकमांडचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांच्याशिवाय तालुक्याला पर्याय नाही, अशी स्थिती निर्माण झाल्यानंतर आता खासदारकीसाठी त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी खानापूर तालुक्यावर त्यांची मांड पक्की केली आहे. त्याशिवाय कित्तूर, हल्याळ, कारवार या तालुक्यातही त्यांचा मोठा गोतावळा आहे. एकंदर, यावेळी दोन्ही पक्षांकडून खासदारकीसाठी मराठा कार्ड वापरले गेल्यास काँग्रेसकडून माजी आमदार अंजली निंबाळकर यांनाही संधी दिली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यावेळची निवडणूक रंगतदार होणार यात शंका नाही.
तायकॉन इंडिया फेडेरेशनची वार्षिक सभा लोणावळा येथे उत्साहात
पुणे: रेन्बो रिसार्ट लोणावळा येथे तायकॉन इंडिया फेडेरेशनची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा विविध राज्यातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली. तायकॉन इंडिया फेडेरेशनचे महासचिव अॅड. राज वागदकर यांनी या सभेला सुरुवात केली. यावेळी या सभेचे अध्यक्षस्थान रवींद्र चोथवे यांनी भूषविले. या सभेला संचालक म्हणून प्रभाकर ढगे उपस्थित होते. सभेच्या सुरूवातीस तायकॉन इंडिया फेडरेशनचे प्रशासकीय प्रमुख संतोष […]