खानापूर: कदंबांची राजधानी म्हणून परिचीत असलेल्या हलशीपासून जवळच असलेल्या एका गावातील हायस्कूलच्या नववीतील विद्यार्थीनीचा तिच्याच हायस्कूलमधील शिक्षकांने विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शाळा आणि शिक्षण संस्थेची बदनामी टाळण्यासाठी सदर शिक्षकाला सेवेतून बेदखल करून या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला आहे. संबंधीत शाळेचा मुख्याध्यापक आणि शिपायाला निलंबीत करून स्थानिकांचे समाधान करण्यात आले आहे. प्रत्यक्षात अल्पवयीन विद्यार्थींनीबाबतीत हा प्रकार घडला असताना शिक्षण संस्थेने संबंधीतांवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत उदासीनता दाखविल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
हलशी-नागरगाळी मार्गावरील नेहमी चर्चेत असणाऱ्या हलगे गावातील हायस्कुलमधील विद्यार्थीनींचा विनयभंग झाल्याची चर्चा गेल्या कांही दिवसंपासून सुरू आहे. शाळेचा एक शिक्षक आणि तेथील शिपाई यांनी सदर विद्यार्थीनींना नातेवाईकांच्या लग्न सोहळ्याला सोबत नेले होते. त्याठिकाणी त्यांनी विद्यार्थीनींसमवेत असभ्य वर्तन केले. शिवाय त्याचे चित्रीकरणही करण्यात आले. त्याच्या चित्रफीती व्हायरल झाल्यामुळे या प्रकरणाचा उलगडा झाला. त्यानंतर शाळेच्या स्थानिक सुधारणा समितीने याची माहिती शिक्षण संस्थेला दिली. संस्थेच्या कारभाऱ्यांनी शाळेची आणि संस्थेची बदनामी टाळण्यासाठी शाळेत बैठक घेऊन संबंधीत शिक्षकाला सेवेतून बेदखल केले. मात्र, शिपाईला मात्र अभय दिले असल्याचे समजते. शिक्षण खात्याला याबाबत कांहीच माहिती नसल्याचे अधिकारी सांगत आहेत.
या प्रकरणात मुलींची चूक असल्यामुळे प्रकरणावर पडदा टाकण्यात आल्याचे स्थानिक कारभारी सांगत आहेत. प्रत्यक्षात सदर विद्यार्थीनी या अल्पवयीन आहेत. त्यामुळे संबंधीत संशयीतांना केवळ बेदखल करून किंवा समज देऊन प्रकरणावर पडदा टाकणे, हाच मुख्य गुन्हा आहे. या प्रकरणाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू असतांनाही आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुकावासीय महिला आणि मुलींचा कैवार घेतल्याचा भास निर्माण करणाऱ्या नेत्यांना त्याची दखल का घ्यावीशी वाटली नाही? हा गंभीर प्रश्न आहे.
विशेष म्हणजे सदर गावात अनेक मातबर (स्वत:ला समजणारे!) नेते असतांना त्यांनीही या प्रकरणी कान हात ठेवले आहेत. त्यामुळे या प्रकरणात कुठेतरी पाणी मुरत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. समाजसेवी संघटना तरी या प्रकरणाची दखल घेतील का? असा प्रश्न सर्वसामान्यातून विचारला जात आहे. स्थानिक नागरिकांनी अशा प्रकरणाबाबत ‘निर्भया’ यंत्रणेकडे तक्रार केल्यास पिडीत तरूणीची ओळख दडवून संबंधीत आरोपींवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. शिक्षण संस्थेच्या कारभाऱ्यांना याची कल्पना नसावी, हीच मोठी शोकांतिका आहे.
मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे विविध स्पर्धा
खानापूर: मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने जानेवारीच्या शेवटच्या आणि फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत अध्यक्ष नारायण कापोलकर यांनी दिली. यंदा प्रतिष्ठान तपपुर्ती साजरी करीत असून त्या अनुषंघाने निबंध, वकृत्व, गायनसह सामान्यज्ञान-प्रज्ञाशोध परिक्षांचे आयोजन करण्यात आले असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. याप्रसंगी उपाध्यक्ष मऱ्याप्पा पाटील, सचिव वासुदेव चौगुले, सदस्य प्रल्हाद […]