मणतुर्गे तालुका खानापूर येथे गुढीपाडवा निमित्त श्री रवळनाथ मंदिराच्या चौकटीचे आगमन सोमवार दिनांक ३१ मार्च २०२५ रोजी सकाळी ठीक १० वाजता श्री सातेरी माउली मंदिर येथे झाले. नुतन चौकटीचे औक्षण गावांतील वतनदार सौ. व श्री. नागेश विठ्ठल पाटील, सौ. व श्री. ज्योतिबा दत्तू गुरव, सौ. व श्री. आबासाहेब नारायणराव दळवी अध्यक्ष श्री रवळनाथ मंदिर जिर्णोद्धार […]
खानापूर तालुक्यातील राशन घोटाळा लवकरच काही तासांत उघड करणार : सुर्यकांत कुलकर्णी ( पंचहमी योजना अध्यक्ष ) यांनी असा इशारा दिला आहे. गोर गरीब जनतेचा तांदूळ कोण गायब करतयं ? कसा गायबं करतात ? कोण कोण सामील आहे ?सगळ्या भानगडी बाहेर काढणार, असे ते म्हणाले. गेले अनेक वर्ष दरमहा लाखो रुपयांचा राशन मधे भ्रष्टाचार चालू […]
खानापूर तालुक़ा ब्लॉक अध्यक्ष अॅड ईश्वर घाडी व माजी झेडपी पांडुरंग देसाई यांनी अस्वल हल्ल्यात जखमी झालेल्या विलास चिखलकर यांच्या कुटुंबियांची केएलई हॉस्पीटल बेळगाव येथे जाऊन भेट घेतली. कालच माजी आमदार तथा एआयसीसी सचिव डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांनी एसीएफ खानापूर यांचेशी संपर्क करून ताबडतोब सरकारी मदत करण्यासंदर्भात सांगितले आहे. कालच चिखलकर यांच्या मुलाकडून आम्ही […]
सातनाळी मराठी शाळेचा सुवर्ण महोत्सव उत्साहात पायाभूत सुविधांपासून वंचित असूनही सातनाळी सारख्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात मिळवलेले यश केवळ कौतुकास्पद नाही तर अभिमानास्पद आहे. येथील अनेक पिढ्यांना घडविण्याच्या कार्यात या गावच्या सरकारी मराठी शाळेने दिलेले योगदान महत्त्वाचे आहे. संकटांना संधी मानून परिस्थितीशी केलेला संघर्ष मानवाला यशस्वी बनवितो. त्याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणून सातनाळी गावाकडे पहावे […]
समांतर क्रांती / खानापूर अनेक कारणांनी चर्चेत असलेल्या हलगा गावात आज झालेल्या बैठकीत श्री महालक्ष्मी कृपेने गाव एकवटले. या बैठकीत महालक्ष्मी मंदिराच्या जिर्णोध्दाराचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे गावात एकीची वज्रमूठ आवळली जाईल, असा विश्वास येथील पुढाऱ्यांनी व्यक्त केला आहे. श्री महालक्ष्मी मंदिर येथे हलगा ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली होती. हलगा ग्राम पंचायत […]
गावगोंधळ / सदा टीकेकर जंगली जनावरांचे हल्ले वाढले की, आपण लगेच गळे काढू लागतो. पण, जेव्हा आपण त्यांची शिकार करतो. त्यांच्या अधिवासात अतिक्रमन करतो, तेव्हा ते बिचारे मुके जीव कुणाकडे त्यांचे गाऱ्हाणे मांडत असतील? कुत्र्यांनी हल्ले केली की लगेच कुत्र्यांना ‘कुत्ते की मौत’ देण्यासाठी सगळेच कसे ताणून उभे राहिलेत! कुत्र्यांची चुक आहेच म्हणा! त्यातही ती […]
नंदगड: हत्तरवाड (ता.खानापूर) येथील रहिवासी भीमराव अमृत पाटील (वय ८७) यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुलगे, चार विवाहित मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन सोमवार दि.२४ रोजी होणार आहे
समांतर क्रांती / खानापूर गेल्या दोन महिन्यापासून खानापूर-अनमोड मार्ग बंद करण्यात आला आहे. आजपासून (ता.२२ मार्च) हा रस्ता वाहतुकीस खुला केला जाणार होता, पण कंत्राटदाराच्या वेळकाढूपणामुळे पुढील महिनाभर तरी हा रस्ता वाहतुकीस बंदच राहणार असल्याचा अंदाज आहे. खासदारांच्या दुर्लक्षामुळेच कामास दिरंगाई होत असल्याचा आरोप यादरम्यान काँग्रेसचे या भागातील नेते ईश्वर बोबाटे यांनी केला आहे. रेल्वे […]
समांतर क्रांती / खानापूर तालुक्यात गेल्या दोन-चार दिवसांत कुत्र्यांच्या हल्ल्यांनी नागरिक हैराण झाले आहेत. आज तर बिडीत एका बालिकेवर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला करून कानाचा चावा घेतल्याच्या घटनेनंतर संतापाची लाट उसळली आहे. दोन दिवसांपूर्वीच निट्टूर येथे सुध्दा एका कॉलेज तरूणीवर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची घटना घडली होती. अशा घटनांनी सध्या तालुक्यात घबराट पसरली आहे. आज बिडी […]
समांतर क्रांती / खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील अनेक गावांना पक्के रस्ते, पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईन तसेच वीज वाहिन्यांच्या कामांसाठी वनविभागाने आडकाठी न आणता विकास कामांना सहकार्य करावे, अशी मागणी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष ॲड ईश्वर घाडी व भूलवाद कमिटीचे सदस्य विनायक मुतगेकर यांनी वनमंत्री ईश्वर खांडरे यांच्याकडे केली आहे. गुरूवारी (ता.२०) बेंगळूर विधानसौध येथे ॲड. घाडी यांनी […]