गेल्या पाच वर्षात तालुक्यात विकासाच्या नावाखाली काय झाले, हे तालुक्यातील जनतेने अनुभवले आहे. मागील निवडणुकीत आमच्या चुकांमुळेच बाहेरच्यांचे फावले. पण यावेळी ती चूक करायची नाही. महिलांनी यावेळी तालुक्याच्या विकासाचा विचार करून तालुक्यातीलच उमेदवाराला निवडून द्यावे. प्रत्येक गोष्ट माझ्यामुळेच झाली असा आव आणणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देऊ. त्या ‘ब्रिटिशां’ना तालुक्याबाहेर हकलून लावू, असे सांगितले. मी प्रामाणिकपणे […]
कारण-राजकारण / चेतन लक्केबैलकर मराठी माणसांवरील अन्याय ही कांही नवी बाब नाही. कर्नाटकी सरकारकडून हा थिल्लरपणा राजरोसपणे गेल्या ६६ वर्षांपासून सुरूच आहे, त्यात काय विशेष. स्थानिक पातळीवर मराठी आणि कानडी भाषिक नेहमीच गुण्यागोविंदाने वावरत आले आहेत. नाही म्हणायला दोन्ही भाषिकांकडून स्वभाषेचा आभिमान बाळगला जातो. तो असायलाच हवा. मात्र, गेल्या ६६ वर्षात एखाद्या शेजाऱ्याने केवळ भाषाद्वेषातून […]
बंगळूर: राज्यात यावेळी सत्तापालट होणार असल्याचे एका सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. खासगी वृत्तवाहिनी आणि सी व्हॉटर्स यांच्या मतदानपूर्व संयुक्त सर्वेक्षणात हा अंदाज व्यक्त करण्यात आला असून एकूण 224 जागांपैकी भाजपला 79 ते 89, काँग्रेसला 106 ते 116, निजद 24 ते 34 आणि इतर 0 ते पाच जागा पटकवतील, असा निष्कर्ष या अहवालात व्यक्त करण्यात आला […]
विशेष / चेतन लक्केबैलकर लोकप्रतिनिधी, राजकीय नेत्यांची संपत्ती हा सर्वसामान्यांच्या कुतुहलाचा विषय असतो. दर पाच वर्षांनी होणा-या निवडणुकांवेळी उमेदवारांना त्यांच्या मालमत्तेचा तपशील द्यावा लागतो. ब-याचवेळा हा तपशिल प्रसार माध्यमातून प्रसिध्दही होतो. यंदाच्या निवडणुकीसाठी रिंगणात असलेल्या खानापूर तालुक्यातील प्रमुख उमेदवारांच्या मालमत्तेत गेल्या पाच वर्षात किती वाढ आणि किती घट झाली, याबाबतचा हा विशेष रिपोर्ट… आमदार, खासदार […]
खानापूर: येथील म.ए. समिती कार्यालयासमोरील नामफलक आज पुन्हा हटविण्यात आला. मराठी मते केवळ समितीलाच मिळणार असल्याने हा अट्टाहास चालला असल्याचे आता स्पष्ट झाले असून संताप व्यक्त करण्यात येत आहे.बेळगाव-पणजी महामार्गावर गणपती मंदिरच्या बाजूला समितीचे संपर्क कार्यालय आहे. पहिल्यांदा नगर पंचायतीची परवानगी नसल्याचे कारण दाखवून फलक काढण्यात आला. त्यावेळी कार्यकर्त्यांनी त्याला आक्षेप घेतला नाही. रितसर परवानगी […]
खानापूर: स्वत:स शिवसेनेचे उमेदवार म्हणवून घेणारे के.पी.पाटील यांचा सेनेशी कोणताही संबंध नसल्याचा दावा सीमाभाग संपर्क प्रमुख अरविंद नागनुरी आणि जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांनी केला आहे. दरम्यान, त्यांनी सेनेचा समितीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर पाटील यांना पाठींबा असून शिवसैनिकांनी त्यांच्या पाठीशी उभे राहावे, आवाहन केले आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे संयुक्त महाराष्ट्राचे स्प्न पूर्ण होर्इपर्यंत सीमाभागात सेना […]
बेळगाव: ग्रामीण मतदार संघात सध्या आर.एम. नावाचं वाढलं घोंघावत आहे. त्यांना गावागावातून मिळणारा पाठिंबा आणि स्वयंस्फूर्तीने दिली जाणारी दाद पाहता मतदानाआधीच त्यांच्या विजयाची नांदी सुरेल झाली आहे. सुस्वभावी व्यक्तिमत्व आणि धडाडीमुळे आपला माणूस म्हणून आर.एम.चौगुले यांनी स्वतःचे अस्तित्व निर्माण केले आहे. विविध कार्यक्रमांसाठी ते गावागावात फिरत आहेत. प्रत्येक गावात नागरिक, तरुण आणि महिला त्यांना पाठिंबा […]
28 जानेवारी 2009 रोजी केंद्र सरकारने आधार कार्डची संकल्पना मंजूर करून नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली योजनेला मूर्तरुप दिले. ही प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा म्हणजे बारा वर्षांपूर्वी 19 सप्टेंबर 2010 रोजी पहिले आधारकार्ड देण्यात आले. महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील तांबाळी गावातील महिला रंजना सोनवणे यांना ते मिळाले. त्यानंतर त्यांचे पती सदाशीव यांनाही आधारकार्ड प्राप्त झाले होते. […]
खानापूर: वृक्ष तोडीमुळे खानापूर-रामनगर महामार्गाचे काम वादात सापडले असतानाच आता जांबोटी-चोर्ला दरम्यान रस्ता रुंदीकरणासाठी हजारो झाडांची कत्तल केली जाणार आहे. नुकताच तोडल्या जाणाऱ्या झाडांची आरेखन करण्यात आले असून पर्यावरण प्रेमींकडून वृक्ष तोडीस विरोध होत आहे.गोव्याला जोडणाऱ्या खानापूर-रामनगर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदारीकरणासाठी सुमारे ३२ हजार झाडांवर कुऱ्हाड चालविण्यात आली होती. त्यामुळे हा वाद उच्च न्यायालयात जाऊन महामार्गाचे […]
कार्यकर्त्यांची पत्रकार परिषद लवकरच भूमिका मांडणार निपाणी : माजी आमदार प्रा सुभाष जोशी यांच्यां नेतृत्वत गेली ३० वर्षे आम्ही कार्य करत आहोत पण यंदा प्रा. सुभाष जोशी यांनी सर्व कार्यकर्त्यांना गृहीत धरून आपली भूमिका जाहीर केली आहे. ही भूमिका आम्हाला मान्य नसल्याने आम्ही प्रा. जोशी यांच्या गटातून बाहेर पडत आहे. अशी माहिती निपाणी येथील सरप्रेमी […]