समांतर क्रांती विशेष कधीकाळी प्रो-काँग्रेस असलेल्या खानापूरच्या म.ए.समितीचे २००८ नंतरच्या सुमारास प्रो-भाजप असे रुपांतर झाले. समितीची शकले होत असलेला हा काळ. साहजिकच मराठी भाषीक तरूणच नाही, तर नेतेसुध्दा भाजपच्या वळचणीला बांधले गेले. समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच उत्तर कन्नड लोकसभेची निवडणूक लढविली जात आहे. अशावेळी समितीचा उमेदवार विजयी होणार का? याहून समितीचा उमेदवार कुणाची मते खाणार? याबाबत […]
बागेवाडी: हुबळी येथील नेहा हिरेमठ हिची हत्या करण्यात आल्याच्या घटनेचा काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांनी निषेध वक्य केला. चिक्कबागेवाडी येथे त्यांनी नेहाला श्रध्दांजली वाहतांना भाजपवर शरसंधान साधले. प्रत्येक गोष्टीचे राजकारण करणाऱ्या भाजपच्या नेत्यांवर त्यांनी तोफ डागली. नेहा ही तरूणी कॉलेजमध्ये शिकत असतांना तिच्याच कॉलेजमधील तरूणाकडून तिच्यावर हल्ला झाला. सरकारने आरोपीला तात्काळ जेरबंद करून त्याच्यावर […]
खानापूर: म.ए.समितीतून आमदार व्हायचे आणि आपले इस्पित साध्य झाल्यानंतर स्वार्थासाठी राष्ट्रीय पक्षांच्या वळचणीला जायचे. हे तुमचे राजकारण असेल तर आम्ही कांही चुकीचे केलेले नाही. तालुक्याचा विकास आणि तालुक्यातील स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी आम्ही काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या सोबत आहोत, जनतेनेदेखील यावेळी विरोधकांना चारीमुंड्या चित्त करण्याचा निर्णय घेतला आहे. समितीच्या जीवावर पेन्शन घेणाऱ्यांनी आम्हाला शहाणपणा […]
उमेदवारी अर्ज दाखल; ‘कारवार’मधून भाजपला हद्दपार करण्याचा निर्धार कारवार: काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांनी आज मंगळवारी (ता.१६) येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा पालक मंत्री ममकाळू वैद्य, माजी मंत्री आर.व्ही.देशपांडे, आमदार भिमान्ना नाईक, आमदार बाबासाहेब पाटील आमदार सतिश सैल उपस्थित होते. अर्ज दाखल करण्यापूर्वी डॉ. निंबाळकर यांनी नेत्यांसमवेत […]
खानापूर: उत्तर कन्नड लोकसभा मतदार संघात खानापूरच्या माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी प्रचाराचा धडाका चालविला आहे. त्यांना खानापूर तालुक्याबरोबरच कित्तूर, हल्याळ, कारवार, कुमठा, भटकळ, शिरसी आणि यल्लापूर विधानसभा मतदार संघातून उदंड प्रतिसाद मिळत आहे. कारवार आणि शिरसीमधून मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्ते काँग्रेसमध्ये प्रवेश करीत असून यामुळे भाजपच्या नेत्यांना धडकी भरली आहे. खानापूर तालुक्यात प्रचाराची […]
विशेष संपादकीय सत्तापिपासू भाजपाने रान उठवल्याच्या काळात इंडिया आघाडीने दंड थोपटले आहेत. अशा काळात कारवार लोकसभा मतदार संघातून माजी केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडेंना भाजपने नारळ दिला. राज्याचे अनेक वर्षे मंत्री आणि विधान परिषदेचे सभापतीपदी राहिलेले विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांना भाजपने उमेदवारी दिली. काँग्रेसने खानापूरच्या माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांना उमेदवारी देत कारवार (कॅनरा) लोकसभेचा गड […]
जांबोटी: चोर्ला महामार्ग दुरुस्तीला विलंब होत असल्याने आज कणकुंबी येथे रास्ता रोको करून चक्काजाम करण्यात आला. परिणामी, तब्बल तीन तास या रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली होती. तहसीलदार गायकवाड यांनी रस्ता दगडुजीचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार अरविंद पाटील यांनी केले. त्यांनी रस्त्याची दुरुस्ती न केल्यास पुन्हा आंदोलन करू असा […]
खानापूर: करसवाडा- म्हापसा गोवा येथे नुकताच झालेल्या मरेथॉनमध्ये ३ किलोमीटर खुला गटातून ५० वर्षावरील गटामध्ये तोपिनकट्टी गावचे सुपुत्र श्री कल्लाप्पा मल्लाप्पा तिरवीर यांनी सुवर्णपदक मिळविलेश्री तिरवीर हे व्यवसाय निमित्त कोल्हापूर येथे स्थायिक आहेत. कोल्हापूर या ठिकाणी सतत प्रयत्न करून ज्योती क्लब बेळगाव यांच्या सानिध्यात गर्लगुंजी गावचे क्लबचे संस्थापक वरिष्ठ कोच एल जी कोलेकर व एल […]
समांतर क्रांती वृत्तखानापूर: भाजपचा हिंदुत्ववादी कार्यकर्ता पंडित ओगले याच्याविरुद्ध खानापूर पोलिसात तक्रार नोंद झाली आहे. नगर पंचायतीचे मुख्याधिकारी राजू वठारी यांनी त्यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार केल्याने ओगले आणि त्याचे समर्थक अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.गेल्या तीन दिवसांपासून नगर पंचायतीचे स्वच्छता कर्मचारी वेतनासाठी आंदोलन करीत आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी गेलेल्या भाजप नेत्यांनी मुख्याधिकाऱ्यांना अर्वाच्य […]
निधन वार्तानागुर्ड (ता.खानापूर) येथील गणपती (भैय्या) लक्ष्मण महाजन (वय 17) याचे दीर्घकालीन आजाराने आज गुरुवारी (ता 31) सकाळी 10 वाजता निधन झाले. त्याच्या पश्चात आई वडील, आजी आजोबा, काका-काकू, तीन बहिणी असा परिवार आहे. त्याच्या निधनाबद्दल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. लैला साखर कारखान्याचे कर्मचारी लक्ष्मण महाजन आणि माजी ग्राम पंचायत सदस्या लक्ष्मी महाजन यांचा […]