समांतर क्रांती विशेष मडगाव/खानापूर: कोकण रेल्वेतून सात किलो सोने असलेली बॅग चोरी केल्या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी कवठे महांकाळ, नवी मुंबई येथील दोघांसह बेळगाव आनि खानापूर येथील तरूणांना अटक केली आहे. या प्रकरणी २८ जून रोजी अक्षय राम चिनवाल (वय २८, रा.खानापूर) तर रविवारी (९ जुलै) बेळगामधून संतोष शिरतोडे याला अटक करण्यात आली आहे. काय आहे […]
समांतर क्रांती विशेष कणकुंबी: दोन वर्षांपासून रस्त्याच्या मागणीसाठी चोर्ला महामार्ग रोखणारे मान गावचे नागरीक कुणाला आठवत नसतीलच! का आठवतील? त्याच नागरीकांनी शहरातून उनाडक्या करण्यासाठी आलेल्यांना समजूतीच्या चार गोष्टी सांगितल्या तर त्या रूचत नाहीत. त्यांची बाजू घेऊन शासन-प्रशासनाशी भांडावं असं तरूणाईला का वाटत नाही? चला तर मग थेट जाऊ या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी चक्क मान या […]
समांतर क्रांती वृत्त लोंढा: वन परिक्षेत्रातील राजवाळ-गवळीवाड्याच्या परिसरात गेल्या कांही दिवसांपासून एका बिबट्याने ठाण मांडले आहे. कांही नागरीकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न त्याने केल्याने परीसरात भितीचे वातावरण आहे. वनविभागाने त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. गावापासून जवळच झाडीत हा बिबट्या वावरत असून तो राजरोसपणे संचार करीत आहे. लोकांची चाहूल लागल्यानंतर तो प्रचंड ओरडत आहे. तसेच हल्ल्याचा […]
खानापूर:कर्नाटक राज्य ज्येष्ठ नागरिक संघटना तालुका खानापूर घटक पदाधिकारी व जेष्ठ नागरिकांची बैठक उद्या सोमवारी सकाळी 11 वाजता ज्ञानेश्वर मंदिर खानापूर येथे बोलाविली आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.मिटींगचे विषयविश्व योगा दिन साजरा करणेबाबत योगाचे योग गुरु श्रीयुत अरविंद कुलकर्णी खानापूर यांचे मार्गदर्शनाखाली होणार आहे.पुढील सहामाही कार्यक्रमाचे नियोजन करणे.
समांतर क्रांती न्यूजबेळगाव : विद्यार्थ्यांनी मानसिक ताणतणावातून मुक्त राहून संगणक तंत्रज्ञानाचा अभ्यास करून आपल्या जीवनात यश प्राप्त करावे असे आवाहन प्रमुख पाहुण्या डॅा. सोनाली सरनोबत यांनी केले. डाॅ. सरनोबत दिया इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजीच्या कार्यक्रमात बोलताना केले.डाॅ सोनाली सरनोबत, संचालिका सोनिया जांग्रा, प्रा पाटील, प्रा गिरण्णावर, हर्षा रगशेट्टी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने 13 व्या वर्धापन दिनाचा शुभारंभ […]
संडे स्पेशल/ चेतन लक्केबैलकर खानापूर: भौगोलिक सलगता असतांनाही खानापूर तालुक्याच्या पश्चिम घाटाला बेटांचे स्वरूप येते. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतांनाही या भागात अजून मुलभूत सुविधा पोहचलेल्या नाहीत. पावसाळ्यातील नागरीकांचे जीवन सर्वसामान्यांच्या अंगावर काटे उभे करते. अदिवासी जमातींपेक्षाही भयावह वाटेल, असं येथील जीवनमान आहे. नेमीची येतो पावसाळा आणि त्याबरोबर तालुक्याच्या पश्चिम घाटातील समस्याही चर्चेत येतात. उन्हाळा […]
समांतर क्रांती वृत्त खानापूर: चापगाव येथील रमेश तुकाराम पाटील यांच्या घरी चोरी झाल्याची घटना रात्री घडली. रमेश पाटील यांचे घर यडोगा रोडला घर आहे. ते काल कुटुंबियांसह बाहेरगावी गेले होते. रात्री अज्ञात चोरट्याने घराचा समोरील कुलूप तोडून घरात प्रवेश केला. आतील तिजोरी फोडून त्यातील दागिने व किमती वस्तू लंपास केल्या आहेत. पाळत ठेवून ही चोरी […]
समांतर क्रांती वृत्तबंगळूर: म्हादईवरील कळसा-भांडुरा प्रकल्पासाठी काँग्रेस सरकारने अर्थसंकल्पात एक हजार कोटींची तरतूद केली आहे. मागीलवेळी भाजपने ५०० कोटींची तरतूद केली होती. एकंदर, प्रत्येक सरकार म्हादई प्रकल्पासाठी निधीचा पाऊस पाडण्याच्या तयारीत आहे. गोव्यातील सरकारने मात्र आतापर्यंत एक थेंबही पाणी वळवू देणार नसल्याच्या केवळ घोषणाच चालविल्या आहेत.
समांतर क्रांती वृत्तबंगळूर: मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी त्यांच्या राजकीय आणि संसदीय कारकिर्दीतील १४ वा अर्थसंकल्प मांडत यापूर्वीचा माजी मुख्यमंत्री रामकृष्ण हेगडे यांच्या नावावर असलेला विक्रम मोडीत काढला. त्याच बरोबर त्यांनी अर्थसंकल्पात पहिल्यांदाच शिक्षण खात्यासाठी तब्बल ३७ हजार कोटींच्या निधीची तरतूद करीत वेगळेपण जपले. भौतिक विकासाबरोबरच राज्याच्या बौधिक विकासाकडेही तेवढ्याच गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले […]