बंगळूर: विशेष अधिवेशनाच्या आजच्या पहिल्यादिवशी विधानसभेच्या आमदारांनी शपथ घेतली. खानापूरचे भाजप आमदार विठ्ठल हलगेकर कोणत्या भाषेत शपथ घेणार याकडे खानापूर तालुकावासीयांचे लक्ष लागून राहिले होते. पण, त्यांनी तालुकावासीयांची घोर निराशा केली. कन्नडमध्ये शपथ घेणारे ते तालुक्याचे दुसरे आमदार ठरले. यापूर्वी काँग्रेसच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी कन्नडमधून शपथ घेत माय मराठीला हरताळ फासला होता. आता […]
जांबोटी: शेतात काम करीत असताना दोन अस्वलांनी महिलेवर हल्ला केल्याची घटना आज शनिवारी सकाळी हब्बनहट्टी येथे घडली. रेणुका इराप्पा नाईक (वय 60) असे अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव असून तिच्यावर बेळगाव येथील इस्पितळात उपचार सुरू आहेत. सादर घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.
बेळगाव: बेळगाव तालुक्यातील मारिहाळ येथे एका तरूणावर धारदार शस्त्राने सपासप वार करून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. महांतेश रुद्राप्पा कर्लिंगन्नावर (वय २३, रा.मारिहाळ) असे या तरूणाचे नाव असून चार-पाच जणांच्या टोळक्याने त्याची हत्या केल्याचे समोर आले आहे. पूर्ववैमनस्यातून ही घटना घडली असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. मारिहाळ पोलिसात घटनेची नोंद झाली असून अधिक तपास […]
मांस खाऊन मंदिरात गेलो तर काय झाले? असा प्रश्न करून वाद ओढवून घेतानाच अहिंद म्हणजे हिंदुत्ववादाला छेद देणारे कर्नाटकातील धाडसी व्यक्तीमत्व म्हणजे सिध्दरामय्या. आता ते दुसऱ्यांदा कर्नाटकाचे मुख्यमंत्री म्हणून शपथबध्द होणार आहेत. त्यांच्याविषयी सर्वसामान्यांना माहीत नसलेले त्यांच्या व्यक्तीमत्वाचे पैलू या लेखात मांडले आहेत.. सिद्धरामय्या यांची जीवनकथा ही या देशातील एका सामान्य माणसाच्या जीवनाची कहाणी आहे, […]
जोयडा : जोयडा तालुक्यातील पशु वैद्यकीय केंद्र म्हणजे असून अडचण आणि नसून खोळंबा अशी स्थिती झाली आहे. तालुक्यातील 140 गावांना 35 पशु वैद्यकीय कर्मचाऱ्यांची गरज आहे, मात्र येथे फक्त 5 कर्मचारीच काम करीत असून त्यामध्ये दोन डॉक्टर, दोन सहाय्यक आणि एका क्लार्कचा समावेश आहे. सेंद्रिय शेती करणारा तालुका म्हणून नावारूपाला येणाऱ्या या तालुक्याची ही लाजिरवाणी […]