समांतर क्रांती वृत्त नंदगड: शिपेवाडी आणि करंजाळ येथे आज गुरूवारी घरफोड्या केल्याच्या घटना उघडकीस आल्या. त्यामुळे नंदगड पोलीसांची अक्षरश: झोप उडाली आहे. तीन ठिकाणी चोरी झाली असून यात पाच तोळे सोन्याचे दागिण्यासह चांदी आणि रोकड लंपास करण्यात आली आहे. याबाबत नंदगड पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी, शिंपेवाडी येथील सुरेश जयराम पाटील हे त्यांच्या कुटुंबीयांसमवेत शिवारात […]
समांतर क्रांती वृत्त खानापूर: तालुक्याचे नुतन आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या ‘शासकीय’ संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज मोठ्या थाटात झाले. आमदारांसाठी तालुका पंचायत आवारात शासकीय कार्यालय असतांनाही त्या कार्यालयालयाला त्यांनी फाटा दिला. यापूर्वीच्या आमदारांचा कित्ता त्यांनी गिरवित तालुका पंचायतीच्या आवारातील कार्यालय टाळले. त्यामुळे पुन्हा एकदा आमदारांना या कार्यालयांचे वावडे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पूर्वीपासून आमदारांसाठीचे […]
बेळगाव: जानेवारी महिन्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्य सरकारने कडक निर्बंध जारी केले होते. १६ जानेवारी २०२२ रोजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला होता. त्यावेळी कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. माजी आमदार अनिल बेनके व धर्मवीर छत्रपती संभाजीराजे […]
समांतर क्रांती वृत्त खानापूर: राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यानंतर विरोधकांच्या बुडाला जणू आग लागली होती. पाच योजना कशा राबविणार असा प्रश्न विचारीत मोर्चे आंदलने केली जात होती. पण, आज त्याच योजनांचा लाभ घेऊन राज्यातील जनता खूष आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांना तोंड दाखवायलाही जागा राहिलेली नाही. जनतेची दिशाभूल करण्यात भाजपचे नेते कोणत्या थराला जातात, हे जनतेला […]
समांतर क्रांती वृत्त खानापूर: मान्सून लांबल्यामुळे हावलदिल झालेल्या बळीराजाला जुलै महिन्यातील पावसाने दिलासा दिला होता. तरीही भात लागवड लांबलीच, आता कुठे भात लागवडीची कामं हातावेगळी करीत असतांना पुन्हा पावसाने हुलकावणी दिली आहे. तालुक्यातील सुमारे ३२ हजार हेक्टरमध्ये यंदा भात पेरणीसह लागवड करण्यात आली आहे. पण, पावसाअभावी भात पिक करपून जाऊ लागल्याने शेतकरी हत:श झाला आहे. […]
समांतर क्रांती विशेष / चेतन लक्केबैलकर बेळगाव जिल्ह्यासह बेळगाव तालुक्याच्या विभजनाची घोषणा पालकमंत्री सतिश जारकीहोळ्ळी यांनी स्वातंत्र्यदिनी केली. गेल्या तीन दशकांपासून सुरू असलेल्या या वादाला पुन्हा तोंड फुटले आहे. विशेष म्हणजे जिल्हा विभजनाच्या वादात आता बेळगाव तालुक्याचे विबाजन हा नवा मुद्दा समोर आल्यामुळे चर्चेचा उधाण आले आहे. बेळगाव जिल्ह्याचे विभाजन झाल्यास खानापूर तालुक्यातील कांही गावांचाही […]
समांतर क्रांती वृत्त माझी माती, माझा देश या संकल्पनेंतर्गत खानापूर तालुक्याच्या प्रत्येक गावातून मूठभर माती दिल्लीत पहचणार आहे. त्याची जबाबदारी प्रत्येक पंचायतीला देण्यात आली आहे. स्वातंत्र्यसैनिक, भारतीय सैनिक आणि केंद्रीय संरक्षण दलाचे पोलीस जे आपल्या प्राणाची बाजी लावून लढले देशाचे स्वातंत्र्य आणि देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी लढणाऱ्यांना आदरांजली वाहण्यासाठीच्या राष्ट्रीय अभियानाचा हा भाग आहे. प्रत्येक गावातील […]
समांतर क्रांती वृत्त महिलांची ‘कामइच्छा’ पूर्ण करा आणि कमवा हजारो रूपये, असा कॉल तुम्हालाही आलाय का? एकाकी महिला आणि तरूणींसोबत सेक्स करण्याचे हजारो रुपये मिळतील, असे कॉल सध्या अनेकांच्या मोबाईलवर येत असल्याने अनेकजन हैराण तर कांहीजन खूष झाले आहेत. प्रत्यक्षात हा ‘मामला’ काय आहे? आमच्या एका वाचकाला एक कॉल आला, त्यात समोरून बोलणारी व्यक्ती ‘स्वत: […]
समांतर क्रांती वृत्त नंदगड: नागरगाळीचे जंगल हे सागवानसाठी प्रसिध्द आहे. नेहमीच तेथे सागवानची तस्करी होत असल्याच्या तक्रारी वनखात्याकडे येत असतात. त्यावरून आज वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी कृष्णानगर (गवळीवाडा) येथे तीन घरांवर धाड टाकून सागवानच्या लाकडासह जंगली डुक्कराचे मटन जप्त करून तीघांना ताब्यात घेतल्याची माहिती वनक्षेत्रपाल रत्नाकर ओब्बन्नावर यांनी दिली. मिळालेल्या माहितीवरून कृष्णनगर येथील गंगाराम बोडके यांच्या घरी […]
समांतर क्रांती वृत्त नंदगड: प्रत्येक घरावर तिरंगा फडकावण्यासाठी भाजपच्या नेत्यांकडून प्रचार आणि प्रसार केला जात आहे. भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी आमदार अरविंद पाटील यांनी सकाळी त्यांच्या घरावर तिरंगा फडकावून या मोहिमेला सुरूवात केली. देशाभिमान हा आमच्या रक्तात आहे, त्यामुळे हर घर तिरंगा मोहिमेची सुरूवात आमच्या घरापासून करीत आहोत, तालुकावासीयांनी त्यांच्या घरावर तिरंगा फडकावून देशाभिमान […]