समांतर क्रांती विशेष / चेतन लक्केबैलकर a-symbol-of-hindu-muslim-unity भारत हा देश जाती आणि धर्मात विभागला जात असतानाच्या काळातही धार्मिक सलोखा जोपासण्याची परंपरा गाव-खेड्यात आहे. खानापूर तालुकादेखील त्याला अपवाद नाही. मोहरमनिमित्त निघणाऱ्या पंजे, डोले, ताजिये आणि सवाऱ्यांच्या मिरवणुकीत मुस्लिमांबरोबरच हिंदू बांधवही सहभागी होतात. हे सगळीकडेच पहायला मिळते. पण, खानापूर तालुक्यातील भुरूणकी गावात हा ताबूत चक्क गाव पाटलांच्या […]
समांतर क्रांती वृत्त खानापूर: म.ए.समितीची सर्वसाधारण सभा रविवारी (ता.३०) सकाळी ११ वाजता शिवस्मारकात बोलाविण्यात आली आहे. कार्यकारिणी आणि जेष्ठांची नियंत्रण समितीची निवड या बैठकीत केली जाणार आहे. तरी खानापूर तालुक्यातील समस्त मराठीप्रेमींनी बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष गोपाळ देसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले आहे.
समांतर क्रांती वृत्तखानापूर : अंगणवाडी भरती प्रक्रियेत मराठी माध्यमाच्या महिला उमेदवारांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटितपणे लढा उभारण्यात येईल. या प्रश्नी महिला आणि बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आणि जिल्हाधिकारी नितेश पाटील यांचे लक्ष वेधण्यासाठी सोमवार दिनांक ३१ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता निवेदन देण्याचा निर्णय लक्ष्मी मंदिर येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला.मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष […]
समांतर क्रांती / कारगिल विजय दिवस विशेष खानापूर: हा तालुका मुळातच शौर्याची गाथा सांगणारा आहे. येथील अनेकांनी विविध क्षेत्रात चमकदार कामगिरी करून तालुक्याचे नाव देशाच्या नकाशावर कोरले आहे. अलिकडे स्वातंत्र्योत्तर काळातही येथील अनेकांनी सैन्यदलात सेवा बजावतांना देशासाठी बलिदान दिले आहे. आज कारगिल विजय दिन. यानिमित्ताने अशाच एका धिरोदात्त वीर सैनिकाची शौर्यगाथा मांडत आहोत.. ..आणि त्यांनी […]
समांतर क्रांती वृत्त A landslide occurred near Dudhsagar, railway traffic stopped कॅसलरॉक: दूधसागरला जाणाऱ्या रस्त्यावर कॅसलरॉक पासूनच्या तिसऱ्या बोगद्याजवळ दरड कोसळली आहे. रेल्वे वाहतूक सायंकाळपासून बंद आहे. त्यामुळे कांही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर कांही दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आल्या आहेत, अशी माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे. दुपारी कॅसलरॉकपासून तिसऱ्या बोगद्याजवळ रेल्वे रूळावर दरड […]
समांतर क्रांती वृत्त बिडी: खानापूर तालुक्यातील अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूरस्थितीमुळे संपूर्ण तालुका बेहाल झाला आहे. या स्थितीची पाहणी करण्यासाठी आलेले पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सतिश जारकीहोळ्ळी यांनी भुरूणकी गावात घरांची पडझड झालेल्यांची भेट घेतली. त्यांना तात्काळ एक लाख विस हजारांचा धनादेश त्यांनी वितरीत केला. यावेळी हातात धनादेश देताच नुकसानग्रस्त खैरुनिसा अब्दुलगणी हेरेकर […]
समांतर क्रांती वृत्त खानापूर: भरपूर गाजावाजा करीत गणेबैल येथील टोल नाक्यावर वसुली सुरू झाली असून दुसऱ्याच दिवसापासून वाहन चालकांच्या लुटीची चर्चा आहे. तसेच मासिक पास देण्याविषयीही संभ्रमावस्था निर्माण झाल्यामुळे टोल पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. केवळ एकेरी टोल आकारला जात असून त्याचा फटका वाहन चालकांना बसत असल्याचे समजते. याबाबत तक्रार करणाऱ्यांशी कर्मचारी हमरीतुमरी करीत आहेत. […]
समांतर क्रांती वृत्त खानापूर: शेतीत चिखल करतांना ट्रॅक्टर अंगावर पडल्याने सेवानिवृत्त शिक्षकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना तिओली येथे घडली आहे. या घटनेत वर्षभरापूर्वीच शिक्षकी सेवेतून सेवानिवृत्त झालेले पांडुरंग लाटगावकर यांचा मृत्यू झाला असून या घटनेबद्दल परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत घटनास्थळावरून समजलेली अधिक माहिती अशी की, सध्या तालुक्यात भात लागवडीची धांदल सुरू आहे. […]
समांतर क्रांती वृत्त Mhadai Arbitration extended by one year खानापूर: केंद्र सरकारने म्हादई तंटा लवादाला आणखी एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. पाणी वाटप केल्यानंतर लवाद विसर्जीत केला जाणार होता. दरम्यान, गोवा सरकारच्या मागणीवरून जलशक्ती मंत्रालयाने लवादाला २० ऑगस्ट २०२४ पर्यंत मुदतवाढ दिल्याची अधिसूचना जारी केली. १३ नोव्हेंबर २०१० साली लवादाची स्थापना करण्यात आली होती. मुदतवाढ […]
खानापूर : तालुक्यातील अंगणवाडी केंद्रांमधील रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या 49 आणि मदतनिसांच्या 84 जागा भरण्यात येणार आहेत. पण या पदांसाठी अर्ज करणाऱ्यांना दहावीत कन्नड हा प्रथम अथवा द्वितीय विषय असणे बंधनकारक करण्यात आले आहे. या निर्णयामुळे मराठी भागातील मराठी भाषिक महिला उमेदवारांवर अन्याय होणार आहे. याबाबत विचारविनिमय करून कायदेशीर दाद […]