समांतर क्रांती वृत्त खानापूर: तालुक्यातील चांगला रस्ता दाखवा बक्षिस मिळवा, अशी योजना तालुक्यातील लोकप्रतिनिधींसाठी आयोजित करण्याची गरज आहे. त्यासाठी विजेत्यांना हमखास ‘गावरान’ पारितोषिके देण्याची योजना प्रत्येक गावातून व्हायला हवी. असे प्रवाशांना वाटू लागले आहे. कारण, तालुक्यातील एकही रस्ता आजघडीला खड्ड्याविना नाही. बैलूरच्या रस्त्याची आवस्था तर शासनाने रस्त्यावरच तलाव योजना राबविली आहे की काय? असा प्रश्न […]
समांतर क्रांती वृत्त खानापूर: महामार्ग आणि टोल प्लाझासाठी करण्यात आलेल्या भूसंपादनाच्या प्रकरणाचा तातडीने निकाल लावू असे अश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी रविवारी येथील बैठकीत दिले. पण, टोल वसुलीला विरोध करू नका असे आवाहनही त्यांनी केले. त्यामुळे आज सोमवारपासून गणेबैल टोल नाक्यावर टोलवसुलीला सुरूवात करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी रविवारी तातडीने शेतकऱ्यांची आणि स्थानिक नेत्यांची बैठक येथील […]
समांतर क्रांती वृत्त खानापूर: अतिवृष्टी झाली तर ओला दुष्काळ, पाऊस नाही झाला तर सुका दुष्काळ शेतकऱ्याच्या वाट्याला येतो. सरकार चुकले तरी शेतकरीच भरडला जातो. लोंढाजवळ महामार्गावरील नव्याने बांधलेला पूल कोसळला. अतिवृष्टीमुळे पूल कोसळला हे सरकारी उत्तर असले तरी या घटनेमुळे मोहिशेतच्या शेतकऱ्यांची मात्र उपासमार होणार हे ठरलेले आहे. लोंढाजवळचा जो पूल कोसळला आहे, तो मुळातच […]
समांतर क्रांती वृत्त खानापूर: शनिवारी दुपारनंतर तालुक्याला पावसाने झोडपायला सुरूवात केली असून मध्यरात्रीपासून पावसाचा जोर कमालीचा वाढला आहे. मलप्रभा, म्हादई, काळी यासह अन्य नद्या-नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक गावांचा शहर आणि इतर परिसराशी संपर्क तुटला आहे. अनेक ठिकाणी घरांची पडझड, रस्ते खचल्याच्या आणि झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. परिणामी […]
समांतर क्रांती वृत्त खानापूर: तालुक्यात सध्या पावसाने थैमान मांडले आहे. नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. अशातही खोळंबलेल्या शेतीच्या कामांना वेग आला आहे. मलप्रभा नदी काठावरील शिवारात काम करतांना पाय घसरून बैल पाण्यात पडला. या बैलाने अत्यंत जिकरीने दुथडी भरून वाहणाऱ्या आणि वेगवान प्रवाह असणाऱ्या १० कि.मी.चे अंतर पोहत जाऊन स्वत:चा जीव वाचविल्याची घटना आज रविवारी […]
समांतर क्रांती वृत्त लोंढा: नकटीच्या लग्नाला सतरा विघ्न अशी खानापूर-महामार्गाची अवस्था झाली आहे. आधीच काम अर्धवट आहे, त्यात आज सकाळी लोंढाजवळील नव्याने बांधण्यात आलेला पूल कोसळला आहे. रस्त्यादेखील खचला असून वाहतूक पर्यायी मार्गांनी वळविण्यात आली आहे. कंत्राटदार आणि महामार्ग प्राधिकरणाच्या अंदाधुंद कारभाराचा फटका प्रवाश्यांना बसत आहे.
समांतर क्रांती / रविवारची मुलाखत अलिकडे बांधावरच्या शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. तशीच पंचायतीच्या कार्यालयात आणि गावाच्या पारावर बसून विकासाच्या गप्पा हाणणारेही ‘पायलीस पंधरा’ मिळतील. पण, खूप कमी सदस्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी पंचायतीचे कार्यालय दणाणून सोडतांनाच प्रत्यक्ष विकास कामावर हातात टिकाव आणि फावडा घेऊन कामाला लागतात. जांबोटी ग्राम पंचायतीच्या अध्यक्ष-उपाध्यक्षांची नुकताच निवड झाली. यात जास्त चर्चेत […]
खानापूर: कर्नाटक राज्य ज्येष्ठ नागरिक संघटनेची खानापूर शहरात चिरमुर गल्ली येथील ज्ञानेश्वर मंदिरामध्ये मासिक बैठक नुकतीच पार पडली. संघटनेचे अध्यक्ष श्री.बनोशी आणि प्रमुख पाहुणे तोपिनकट्टी महालक्ष्मी संस्थापक संचालक चांगाप्पा निलजकर, अरविंद कुलकर्णी, सुभाष देशपांडे, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि श्री देवेगौडा चारिटेबल ट्रस्ट हॉस्पिटलचे बेळगाव येथील डॉ. फरात मुल्ला व डॉ. नागराज राठोड यांच्या […]
समांतर क्रांती वृत्त खानापूर: नाथाजीरावांचे कार्यकर्तृत्व मोठे आहे. केवळ शून्यातून स्वप्नवत विश्व निर्माण करण्याची किमया त्यांच्या कार्यामुळेच ‘मराठा मंडळ’ या संस्थेने साधली आहे. कर्नाटकात नावाजलेल्या संस्थांमध्ये स्वतःचे स्थान निर्माण करण्याचा मान नाथाजीरावांच्या अचाट कर्तृत्वामुळेच ‘मराठा मंडळ’ या संस्थेला मिळाला आहे. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या तत्त्वावर जगत स्वतःला संस्थेच्या कार्यात समर्पित करत सतत संस्थेच्या […]
समांतर क्रांती विशेष खानापूर: हा तालुका म्हणजे सरकारी अधिकारी, त्यांचे स्थानिक दलाल आणि लोकप्रतिनिधींच्या सेवेचा आव आणणाऱ्या लाळपुस्यांचे कुरण झाला आहे. लोकप्रतिनिधी बदलतात, पण परिस्थिती जैसे थेच राहते. भाजपचे विठ्ठल हलगेकर यांनी आमदारकीची सूत्रे स्विकारून तीन महिन्यांचा कालावधी उलटत आला. तरीही तालुक्यात कांही बदल होतील, अशी आशा राहिली नाही. तसे वातावरण त्यांनी स्वत:च निर्माण करून […]