खानापूर: काल शेवटच्या दिवशी उत्तर कन्नड लोकसभा मतदार संघात खानापुरातून आणखी एक उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. म.ए.समितीचे नेते अविनाश पाटील (मणतुर्गे) यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. त्यांच्या सोबत माजी नगरसेवक विजय पाटील, प्रदिप पाटील, शिवाजी पाटील आदी उपस्थित होते. खानापूर तालुक्यातून काँग्रेसच्या डॉ. अंजली निंबाळकर, म.ए.समितीचे निरंजन सरदेसाई, राजशेखर हिंडलगी, के.पी. पाटील यांनी यापूर्वी अर्ज दाखल केले होते. आता अविनाश पाटील यांनी अर्ज दाखल केल्याने अर्जसंख्या पाच इतकी झाली आहे.खानापूर तालुक्यातून काँग्रेसच्या डॉ. अंजली निंबाळकर, म.ए.समितीचे निरंजन सरदेसाई, राजशेखर हिंडलगी, के.पी. पाटील यांनी यापूर्वी अर्ज दाखल केले होते. आता अविनाश पाटील यांनी अर्ज दाखल केल्याने अर्जसंख्या पाच इतकी झाली आहे.
उद्या समिती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन
कारवार लोकसभा मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांच्या खानापूर येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन रविवारी (ता.२१) दुपारी चार वाजता होणार आहे.
वर्दे पेट्रोल पंप शेजारी सरदेसाई यांच्या कार्यालयाचे उद्घाटन होणार असून यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती व खानापूर तालुका समितीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. समितीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष गोपाळ देसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील यांनी केले आहे.
खानापुरात सकाळीच पावसाची हजेरी
खानापूर: आज शनिवारी सकाळीच विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. एरवी, सायंकाळी ढग दाटून येत होते. मात्र आठच्या सुमरास अचानक आभाळ ढगांनी भरून निघाले आणि कांही क्षणातच पावसाला सुरूवात झाली. तालुक्यातील नंदगड भागातदेखील पावसाने हजेरी लावली. पावसाला सुरूवात झाल्याने शेतकरी सुखावला असला तरी एवढ्या पावसाने शिवारात मशागतीची कामे होणार नाहीत. शेतकऱ्याना दमदार पावसाची […]